Nashik Women Assault Case: विशेष तपास पथकाच्या मार्फत या संपूर्ण प्रकरणाचा सध्या कसून तपास सुरू आहे, तर एक जण अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नाशिकच्या कंपनीत तरुण-तरुणींना जाळ्यात आरोपी काय-काय करायचे? FIR मधून ‘मोडस ऑपरेंडी’ उघड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिकमधील TCS कंपनीच्या शाखेत घडलेल्या प्रकाराने सर्व देशात एकाच खळबळ उडाली आहे. या कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून विशिष्ट धर्मातील कर्मचारी आणि कंपनीतील HR या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात पीडित ८ महिला कर्मचाऱ्यांनी आणि एका पुरुष कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारींमधून कंपनीतील घटनाक्रमाविषयी धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
तरुण-तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याची नाशिकमधील कंपनीतील ही मोडस ऑपरेंडी आता समोर आली आहे. महिला कर्मचाऱ्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यासाठी संशयित आरोपी वेगवेगळे उपाय करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपली मोहीम फत्ते करण्यासाठी हे संशयित कामाची वेळ संपल्यानंतरही अधिक वेळ कंपनीत थांबून कंपनीचे काम करत असल्याचे भासवत असत आणि संशयास्पद प्रकार करत असल्याचंही तपासातून उघड झालं. याकरिता कंपनीच्या मालमत्तेचाही वापर करण्यात आला. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून रणनीती आखल्यानंतर हे ऑपरेशन राबवले जात असे.
सर्वात पहिला गुन्हा हा नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल झाला. यात कंपनीत काम करणाऱ्या २५ वर्षीय महिला कर्मचारी हिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. धर्मांतरण करण्याचा दबाव देखील टाकण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातच मुंबईनाका पोलीस ठाण्यात देखील एक महिला कर्मचाऱ्याने विनयभंग केल्या प्रकरणी तक्रार नोंदविली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील कामाला असलेल्या एका २५ वर्षीय महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी दोन पुरुष सहकाऱ्यांसह एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्याबाबतची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला ही ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ काम करत होती. १ मे २०२३ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत संशयित आरोपी रझा रफीक मेमन आणि शाहरुख हुसेन शौकत कुरेशी यांनी पीडितेशी गैरवर्तन केले होते. आरोपी रझा याने पीडितेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिच्या वैयक्तिक वैवाहिक आयुष्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, तर, शाहरुख कुरेशी याने पीडितेकडे जेव्हा ती कामावर साडी घालून आलr होती त्यावेळी तिच्याकडे वाईट नजरेने टक लावून पाहत तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य केलं होतं. एवढ्यावर न थांबता त्याने पीडितेला फिरायला येण्याबाबत देखील विचारणा केली असल्याचे पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, पीडितेने या त्रासाबाबत तिची टीम लीडर संशयित अश्विनी अशोक चैनानी यांच्याकडे वारंवार तोंडी तक्रार केली होती. मात्र, चैनानी यांनी या तक्रारीची दखल न घेता उलट आरोपींच्या कृत्यास चिथावणी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५, ७८, ७९, ४९, ३५६ आणि ३(५) अन्वये गुन्हा (क्र. १६३/२०२६) दाखल करण्यात आला आहे. संशयित रझा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांना अटक करण्यात आली असून, सध्या हे दोघे आणि त्यांच्या इतर साथीदारांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा