भोंदू अशोक खरातच्या संपर्कात असणाऱ्या राजकीय नेत्यांची, अधिकाऱ्यांची कुंडलीच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बाहेर काढली आहे. धक्कादायक म्हणजे या नेत्यांच्या यादीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचंही नाव असल्याचा आरोप दमानियांनी केला. जयंत पाटलांसोबतच दमानियांनी इतर नेत्यांचेही नाव घेतले. शिवाय ज्यावेळी अजित पवार यांच्या घराबाहेर जादूटोण्यासारख्या प्रकार घडल्याचं समोर आलं होतं त्यावेळी खरातचं लोकेशन ठाणे होतं असा गौप्यस्फोटही दमानियांनी केला.