Konkan Railway: दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी आता महत्त्वाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कोकणवासियांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: कोकणवासींची प्रथम पसंतीची रेल्वेगाडी असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरहून सुरू होण्याच्या दिशेने रेल्वे प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स्प्रेससाठी कार्यकारी व्यवहार्यता (ऑपरेशन फिजिबिलिटी) तपासण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उत्तर पश्चिमेचे शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी केलेल्या पत्रव्यवहाराला उत्तर देताना रेल्वेमंत्री यांनी हे आदेश दिल्याचे स्पष्ट करण्यात आले. हे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे.
एक्सप्रेस बंद करण्यामागचं कारण काय?
करोनाकाळात, 2020मध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करून दिवा-रत्नागिरी सुरू झाली. त्यातच दादर-गोरखपूर ही विशेष गाडी नियमित केल्याने कोकणवासींच्या संतापात भर पडली. प्रवासी संघटना तसेच आमदार-खासदारांनी रेल्वेमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करत दादर-रत्नागिरी एक्स्प्रेस नियमित करण्याची मागणी केली.Mumbai Metro 4: सहा वर्षांपासून रखडलेल्या कामाला वेग! वडाळा-कासारवडवली मेट्रोचं शेवटचं स्थानक बनणार; मुंबई-ठाणे प्रवास सुलभ होणार
जनसुविधेच्या दृष्टीने दिवा-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत दादर रेल्वे स्थानकावरून सुरू करण्याच्या कार्यकारी व्यवहार्यता तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशा आशयाचा मजकूर रेल्वेमंत्री यांनी पाठवलेल्या पत्रात आहे. दादर-रत्नागिरी गाडीला दिवा मार्गे जाताना उपनगरी रेल्वे रूळ ओलांडावे लागतात. यामुळे सहा ते आठ लोकलना याचा फटका बसतो. त्याचा परिणाम रेल्वेच्या वक्तशीरपणावर होतो. यामुळे 2020 पासून ही गाडी दिव्याहून चालवण्यात आली, असे स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे आहे.
सविस्तर तपासणी नंतर अंतिम निर्णय
वायकर यांना दिलेल्या उत्तरात वैष्णव म्हणाले की, प्रवाशांसाठी ही मागणी रेकॉर्डवर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, कोणत्याही अंतिम निर्णयापूर्वी अधिकाऱ्यांना ऑपरेशनल व्यवहार्यतेचं मूल्यांकन करण्यास सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयासमोर अहवाल सादर करण्यापूर्वी दादर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे का हे पाहणे गरजेचे आहे. तसेच, वेळापत्रक तयार करणं, तांत्रिक अडचणी आणि उपनगरिय रेल्वे सेवांवर होणारा परिणाम लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतीही अंतिम मुदत निश्चित नसल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
Mumbai News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 13-14 एप्रिल शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक बदल; आंबेडकर जयंतीनिमित्ताने निर्देश
यापूर्वी मध्य रेल्वेने दिवा-रत्नागिरी पॅसेंजर सुरू करण्यामागे तांत्रिक अडचणींचे कारण दिले होते. दादरहून रत्नागिरीला जाणाऱ्या ट्रेनला दिव्याजवळ उपनगरिय रेल्वे ट्रॅक ओलांडावे लागते. यावेळी सहा ते आठ लोकल सेवांवर परिणाम होतो. त्यामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडतं. यामुळेच ही सेवा कायमस्वरूपी दिव्यावरून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गेल्या माहिन्यात दादरवरून गोरखपूर साठी नियमित रेल्वेसेवा सुरू करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानंतर कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी केंद्र सरकारकडे दादर-रत्नागिरी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. दादर रेल्वे स्थानकावरून पश्चिम आणि मध्य रेल्वे या दोन्ही प्रवाशांना सहजपणे कोकणात प्रवास करणं शक्य व्हायचा. परंतु, दिवा रेल्वे स्थानक ठाण्याच्याही पुढे असून मुंबईतील प्रवाशांना तिथे पोहचणे अवघड होते. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत होऊ शकते का याचा अभ्यास करण्याचे आदेश दिले आहेत.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा