Pandharpur Acid Attack: पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ॲसिड हल्ला झालाच नव्हता, तरुणीने स्व:च अंगावरॲसिड ओतलं होतं.
शहरातील मध्यवस्तीत राहणाऱ्या तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा हल्ला अज्ञात व्यक्तींनी केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता स्वतः तरुणीने माध्यमांशी बोलताना या प्रकरणामागील सत्य उघड केले आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, घरातील सततच्या कौटुंबिक वादांमुळे ती मानसिक तणावाखाली होती. विशेषतः आजीकडून वारंवार ‘तुला रोग झाला आहे, त्यामुळे तू सतत आजारी पडतेस,’ अशा प्रकारच्या बोलण्यामुळे ती अधिकच नैराश्यात गेली होती. या मानसिक तणावातूनच जीवन संपवण्याच्या उद्देशाने तिने स्वतःवर ॲसिड ओतून घेतल्याचे सांगितले. यामुळे पोलिस तपासाची दिशा बदलण्याची शक्यता आहे.
सोलापुरात Eknath Shinde चा भाजपच्या पालकमंत्र्यांवर निशाणा, ‘पैसा जनतेचा आहे’
दरम्यान, तिच्यावर सध्या उपचार सुरू असून, तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मानसिक आरोग्य, कौटुंबिक वातावरण आणि संवाद यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे ; तसेच अशा घटना टाळण्यासाठी समाजात जागरूकता वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Nagpur Crime: पैशांपुढे माणुसकी हरली! नागपुरात दिव्यांग ज्येष्ठाला घरात घुसून संपवलं, तीन तरुणांवर गुन्हा दाखल
तर दुसऱ्या एका घटनेत, मोहाडी तालुक्यातील करडी येथे एका ३५ वर्षीय युवकाने राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत महेश चोपराम वट्टी हा मूळचा देवरी येथील रहिवासी असून तो करडी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता . महेश याने १२ एप्रिलच्या रात्री आपल्या राहत्या खोलीत साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. या घटनेची माहिती करडी पोलिसांना देण्यात आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.
