• Sat. Jun 6th, 2026
    Nagpur Crime: पैशांपुढे माणुसकी हरली! नागपुरात दिव्यांग ज्येष्ठाला घरात घुसून संपवलं, तीन तरुणांवर गुन्हा दाखल

    Nagpur Crime: पैशांसाठी घरात घुसून दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची निर्घृणपणे हत्या झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

    नागपूर क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : पैशांसाठी गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने घरात घुसून दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली. ही थरारक घटना वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णानगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून एका मारेकऱ्याला अटक केली.

    विलास सुभाष चौधरी (वय २५) असे अटकेतील मारेकऱ्याचे तर जितेंद्र संतोष वगारे (वय २५) आणि प्रवीण ढिल्लन चव्हाण (वय २५, सर्व रा. सुराबर्डी वस्ती) अशी फरार मारेकऱ्यांची नावे आहेत. सहेसराम बाजीराव केवट (वय ६०) असे मृताचे नाव आहे.
    Maharashtra TimesKoradi Plant Accident: कोराडी वीजनिर्मिती केंद्रात मोठी दुर्घटना; गरम राख पडल्याने 8 कामगार भाजले, चौघांची प्रकृती चिंताजनक
    सहेसराम यांना रिमा व सीमा या दोन मुली आहेत. दोघींचे लग्न झाले असून त्या वाडी भागात राहतात. सहेसराम यांच्या पत्नी यशोदा या आठवा मैल परिसरात वेगळ्या राहतात. चार वर्षांपूर्वी सहेसराम यांना गँगरीन झाले. त्यामुळे त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून कापण्यात आला. ते कुबड्या घेऊन चालतात. त्यांना ग्रामपंचायतीकडून शासकीय मदत मिळायची. एप्रिल महिन्यात त्यांना पैसे मिळाले. रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास रिमा, त्यांचे पती, बहीण सीमा व मामेभाऊ कार्तिक हे सहेसराम यांना भेटायला गेले. ‘माझ्या अपंगत्वाचे पैसे मिळाले आहेत. त्या पैशांनी मी नात वैधवीला चांदीचे कडे करून देईन’, असे ते रिमा यांना म्हणाले.

    रात्री १०.३० वाजता सर्वजण घरी परतले. सहेसराम यांच्याकडे पैसे असल्याची माहिती विलासला मिळाली. त्याने साथीदारांच्या मदतीने लुटपाटीचा कट आखला. मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास विलास, जितेंद्र व प्रवीण त्यांच्या घरात घुसले. त्यांच्याजवळील पैसे हिसकावले. दोघांनी त्यांना पकडले. विलासने उशीने त्यांचे तोंड दाबले. यात सहेसराम यांचा सहेसराम यांनी त्यांचा प्रतिकार केला. मृत्यू झाला. सहेसराम यांच्या घरातून आवाज येत असल्याने शेजाऱ्याने रिमा यांना माहिती दिली. रिमा, सीमा व त्यांचे नातेवाईक तेथे आले. दार आतून बंद होते.
    Maharashtra TimesCrime News : दोन शॅम्पूच्या बाटलीत निघाले 50 कॅप्सूल, किंमत तब्बल 4 कोटी 26 लाख, नागपुरात DRI ची मोठी कारवाई
    रिमा व सीमा यांनी सहेसराम यांना आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी दार तोडण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान विलासने दार उघडले. ‘तू इथे काय करतोस’, अशी विचारणा सीमा यांनी केली. ‘मी दारू पिण्यासाठी आलो होतो’, असे सांगून विलास तेथून पसार झाला. रिमा व त्यांचे नातेवाईक घरात गेले असता सहेसराम बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पैसे गायब होते.

    Maharashtra TimesNagpur Crime : संसारासाठी खूप त्रास सहन केला, पण हळूहळू सना पूर्णपणे खचली; लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांत जीवन संपवलं, सुखी आयुष्याची आस अधुरीच राहिली
    रिमा व सीमा या स्वयंपाकघरात गेल्या असता फ्रिजच्या मागे जितेंद्र तर प्रवीण हा ओट्याखाली लपलेला त्यांना दिसला. दोघींनी मदतीसाठी आरडाओरड केली. दोघांनी त्यांना धक्का देत पळायला लागले. रिमा व सीमा यांनी प्रवीणला पकडले. त्यानेही दोघींना धक्का देत पळ काढला. त्यानंतर रिमा यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. माहिती मिळताच वाडी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी सहेसराम यांना मेयोत दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा