• Mon. Jun 15th, 2026
    जिन्यात मृत्यू दबा धरुन बसलेला! खेळता-खेळता शंभू रडू लागला, प्रकृती बिघडताच डॉक्टरांकडे नेलं, पण दांडगे कुटुंबावर काळाने घाव घातलाच

    Chhatrapati Sambhajinagar Toddler Death : शंभू रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या जिन्यावर खेळण्यात दंग होता. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या एका विषारी नागाने शंभूच्या उजव्या पायाला दंश केला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील कुंभेफळ परिसरातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रविवारी रात्री घराच्या जिन्यात खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. मुलाच्या जाण्याने दांडगे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शंभू ज्ञानेश्वर दांडगे असे या मृत बालकाचे नाव आहे.

    उजव्या पायाला नागाचा दंश

    दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शंभू हा रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या जिन्यावर खेळण्यात दंग होता. मात्र, तिथे आधीच दबा धरून बसलेल्या एका विषारी नागाने शंभूच्या उजव्या पायाला दंश केला. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून आईने तातडीने तिथे धाव घेतली, तेव्हा मुलाच्या पायातून रक्त येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही वेळातच शंभूची प्रकृती बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला तात्काळ करमाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.

    उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली

    प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर शहरातील मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, नशिबाचा खेळ असा की, दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. शंभू हा आपल्या आई-वडिलांचे पहिले अपत्य होता, त्याच्या अशा जाण्याने संपूर्ण कुंभेफळ गावावर शोककळा पसरली आहे.
    Maharashtra TimesMS University Vadodara : विद्यापिठात ‘धक धक’ गाण्यावर डान्स, आक्षेपार्ह नृत्य केल्याची टीका; विद्यार्थिनी रडत म्हणाली, गाणं चुकलं असेल, पण साडी नेसून नाचलेय

    उन्हामुळे सापांचा वावर वाढल्याचा अंदाज

    उन्हाचा कडाका वाढल्याने सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

    भाजप करेक्ट कार्यक्रम करणार, रोहित पवारांचा शिवसेनेला इशारा, श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर

    पुण्यात प्राध्यापकाचा अपघाती मृत्यू

    दुसरीकडे, शिवाजीनगर येथील कार्यालयात मतदार यादी सखोल पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी दुचाकीवरून जात असताना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घसरून पडून त्यांचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी लोहगावमध्ये घडली. ज्ञानेश्वर रोटे असे अपघातात मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
    Maharashtra TimesCrime News : दोन नवरदेवांची वरात, एकाच वधूच्या दारात; मामला गरम झाला, पोलीस म्हणाले, नवऱ्या मुलीनेच आता दोघातला एक निवडावा
    प्राध्यापक रोटे सोमवारी दुपारी दुचाकीवरून उपजिल्हाधिकारी यांच्या बैठकीला चालले होते. लोहगाव रस्त्यावरील स्पार्क स्प्रिंग सोसायटीसमोरून दुचाकीवरून जाताना त्यांची दुचाकी पसरली. ते चेहऱ्यावर पडून जखमी झाले. रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाने त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रोटे मूळचे अहिल्यानगरचे होते. इंदापूर तालुक्यातील कळंब येथून त्यांची लोहगाव येथे बदली झाली होती.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा