Pune Flyover Project: शिवाजीनगर परिसरातील वाहतूककोंडीमुळे मध्यवर्ती पुण्यातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे शिवाजीगनर परिसरात उड्डाणपूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
कुठे-कसा असेल मार्ग?
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पात एक उड्डाणपूल आणि एक ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार आहे. सागर संकुलाला जुन्या पुणे-मुंबई रस्त्यापर्यंत हा मार्ग जोडणार आहे. येत्या १८ महिन्यात प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे कृषी महाविद्यालय आणि शिवाजीनगरदरम्यान वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. दररोज गर्दीच्या वेळी शिमला ऑफीस चौक, संचेती रुग्णालयाजवळील जंक्शन आणि पुणे इंजिनिअरिंग महाविद्यालयासमोरील चौकात नेहमी वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे अनेकदा आजूबाजूच्या मार्गांवरही कोंडी वाढते. त्यामुळे संपूर्ण परिसरातील वाहतूक सेवा विस्कळीत होते. त्यामुळे मध्यवर्ती पुण्यातील सर्व महत्त्वाच्या मार्गांवर कोंडी होते.
Purandar International Airport: पुरंदर विमानतळासाठी ९१ टक्के शेतकऱ्यांची संमती, सरकारचे ‘डीपीआर’ तयार करण्याचे आदेश; कोणत्या गावांमध्ये प्रकल्प?
यामुळे पुणे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या मार्गामुळे वाहनचालकांना कोंडीचे मार्ग बायपास करून थेट इच्छुकस्थली पोहोचता येणार आहे. अनेक इंटरसेक्शनवरील गर्दी कमी होणार आहे. जुन्या पुणे-मुंबई मार्गालगत आणि गणेशखिंड मार्गाच्या परिसरातील कनेक्टिव्हीटी सुधारण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प आता आवश्यक अंमलबजावणी आणि बांधकाम टप्प्यांतून पुढे जाईल. प्रकल्पाचं बांधकाम सुरू असताना विद्यमान वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही यावर लक्ष ठेवलं जाईल. तसेच, वाहनचालकांना त्रास न होण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
२०२५ मध्ये प्रस्ताव सादर
महापालिकेने प्रितम एंटरप्राइझला प्रकल्पाचं सल्लागार म्हणून १४ ऑगस्ट २०२५ रोजी नेमण्यात आलं होतं. स्थलाकृतिक आणि भूतांत्रिक सर्वेक्षण, तसेच वाहतूक अभ्यासानंतर, सल्लागाराने उड्डाणपुलाचा आराखडा तयार केला आणि महापालिकेसमोर सविस्तर प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक आणि तांत्रिक कागदपत्रे सादर केली. प्रकल्पाला २० नोव्हेंबर २०२५ रोजी तांत्रिक मंजुरी मिळाली आणि १९ जानेवारी २०२६ रोजी महापालिका आयुक्तांनी निविदा प्रक्रीया सुरू करण्यास परवानगी दिली.
Pune News : पर्यटनाला गेला, अर्ध्यातूनच माघारी, मित्रांना पुन्हा दिसलाच नाही, वाटेत चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा; नाणेघाटात तरुणाचा थरारक अंत
पुणे महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या प्रक्लपासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध नस्ल्यामुळे केवळ २.६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या रकमेचा वापर करून प्राथमिक कामांना सुरुवात करण्यात येईल. हा प्रकल्प अनेक आर्थिक वर्षांमध्ये पसरलेला असल्याने, उर्वरित निधी भविष्यातील पालिका अर्थसंकल्पांमधून टप्प्याटप्प्याने वाटप केला जाईल.
