• Sat. Jun 13th, 2026
    Nandurbar Crime : ‘हॉटेल सुरू ठेवण्याची हिम्मत कशी केली?’ नंदुरबारमध्ये ‘हॉटेल मंदाकिनी’च्या मॅनेजरला संपवलं

    Nandurbar Hotel Mandakini Manager Killed : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच नंदुरबारमध्ये हॉटेल मंदाकिनीच्या मॅनेजरची हत्या करण्यात आली आहे.

    नंदुरबार हॉटेल मंदाकिनी मॅनेजर सागर जाधव हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावरील ‘हॉटेल मंदाकिनी’ येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेत मॅनेजरचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाच संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    स्कॅनर मशीन डोक्यावर मारले

    मिळालेल्या माहितीनुसार, सागर रमेश जाधव (वय २५, रा. रायसिंगपुरा, नंदुरबार) हा ‘हॉटेल मंदाकिनी’ येथे मॅनेजर म्हणून कार्यरत होता. काल शनिवारी रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास काही संशयित हॉटेलमध्ये घुसले आणि जुन्या वादाच्या कारणावरून सागर जाधव याच्यावर हल्ला चढविला. संशयितांनी ‘हॉटेल सुरू ठेवण्याची हिम्मत कशी केली?’ असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर कैलास पाडवी याने लाकडी दांड्याने सागर जाधव याच्या पोटावर, हातावर व डोक्यावर जबर मारहाण केली, तर विक्की राजपूत याने स्कॅनर मशीन डोक्यावर फेकून मारले. इतर आरोपींनीही हाता-बुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या भीषण हल्ल्यात सागर जाधव गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं; मात्र, उपचारादरम्यान पहाटे दोन वाजून पाच मिनिटांनी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
    Maharashtra TimesNashik News : महिला कर्मचाऱ्यांचे जबरदस्ती धर्मांतर अन् अत्याचार प्रकरण, IT कंपनीकडून निवेदन जारी
    या घटनेप्रकरणी कुणाल मराठे यांच्या फिर्यादीवरून विक्की राजपूत, कैलास पाडवी, दीपक ठाकरे, निलेश ऊर्फ बंटी चौधरी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत.
    Maharashtra TimesSolapur News : भोंदूबाबा अशोक खरातचे धागेदोरे सोलापूरपर्यंत, खरातच्या अन् पत्नीच्या नावे करोडोंची जमीन खरेदी

    महिलेकडे शरीरसुखाची मागणी

    लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी राज्य सरकारकडून मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी राहिली आहे त्या महिलाकंडून ई-केवायसी केली जात आहे. ग्रामीण भागातील महिला ई-केवायसीसाठी ई-सेवा कार्यालय किंवा इतर कुणाची मदत घेत आहेत. पण जळगावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ई-केवायसी करुन देण्याच्या मोबदल्यात एका नराधमाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. तसेच इतर एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गोकुळ चव्हाण या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा