Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, पुण्यात अशोक खरात प्रकरणासारखं प्रकरण उघडकीस आलं आहे. एक महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे.
स्वारगेट लॉजवर महिलेवर अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या अशोक खरात प्रकरणानंतर पुण्यातही तत्सम संतापजनक प्रकार समोर आला आहे. पती-पत्नीतील मतभेद दूर करून पुन्हा एकत्र आणण्याचं आमिष दाखवत एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी एका स्वयंघोषित ‘देवऋषी’विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ४२ वर्षीय महिलेनं स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी औदुंबर मनोहर गडदे (वय ४३, रा. तरटगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार २७ मे २०२१ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत घडल्याचं समोर आलं आहे.
लॉजवर नेत अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्वत:ला ‘देवऋषी’ असल्याचं भासवून महिलेला तिच्या वैयक्तिक अडचणी सोडवून देण्याचं आश्वासन दिलं. विशेषतः पतीशी असलेले मतभेद दूर करून दोघांना एकत्र आणण्याचं आमिष दाखवत त्याने तिचा विश्वास संपादन केला. ओळख वाढवल्यानंतर आरोपीने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर अत्याचार केला. Nandurbar Crime : ‘हॉटेल सुरू ठेवण्याची हिम्मत कशी केली?’ नंदुरबारमध्ये ‘हॉटेल मंदाकिनी’च्या मॅनेजरला संपवलं
बंगला धेऊन देण्याचं आमिष
यानंतर आरोपीने लोणेरे, उतेखोल आणि माणगाव आदी ठिकाणी वारंवार तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. याचदरम्यान आरोपीने नोकरी लावून देण्याचं, बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करून जादा परतावा मिळवून देण्याचं, तसेच बंगला घेऊन देण्याचं आमिष दाखवत महिलेची फसवणूक केली. फिर्यादी महिलेचा एकटेपणा ओळखून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली आणि वेळोवेळी तब्बल ५० लाख ५५ हजार रुपये उकळले. तसेच दारूच्या नशेत तिच्या घरी जाऊन शिवीगाळ, दमदाटी करून जबरदस्तीने अत्याचार केल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे. Solapur News : भोंदूबाबा अशोक खरातचे धागेदोरे सोलापूरपर्यंत, खरातच्या अन् पत्नीच्या नावे करोडोंची जमीन खरेदी या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील करत असून, आरोपीविरुद्ध फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, अशा भोंदूगिरीच्या नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत असून संतापाची लाट पसरली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा