आमदार रोहित पवार यांच्या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार-खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षाकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्रांचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे”, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : भाजप आणि मित्रपक्षांबाबत सूचक इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर देत टोला लगावला आहे. “त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार करावा, आमच्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही,” असे स्पष्ट शब्दांत श्रीकांत शिंदेंनी म्हटले. पुण्यात माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये भाजप भविष्यात मित्रपक्षांचीच ‘शिकार’ करेल, असा दावा केला होता. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा रंगल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला थेट उत्तर देत सांगितले की, “प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी काम करत असतो. आम्हीही आमच्या पक्षाच्या संघटनावर लक्ष केंद्रीत केले आहे. बैठका घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत.” त्यांनी स्पष्ट केले की, शिवसेनेत संघटन बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध काम सुरू आहे आणि त्यासाठी अशा बैठका सातत्याने घेतल्या जाणार आहेत.
रोहित पवार यांनी केलेल्या ‘मित्रपक्षांची शिकार’ या विधानावर भाष्य करताना शिंदे यांनी विरोधकांना आपल्या पक्षातील घडामोडींवर लक्ष देण्याचा सल्ला दिला. “आमच्याबाबत चिंता करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या पक्षात काय चाललंय ते पाहावं,” असा थेट टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावला.
दरम्यान, श्रीकांत शिंदे म्हणाले की, पुढील तीन वर्षांत कोणत्याही निवडणुका नसल्यामुळे हा काळ संघटन मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. “वॉर्डनिहाय बैठका घेऊन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणार आहोत. मतदार निसटू नयेत यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाईल,” असे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे प्रश्न ऐकून घेणे आणि पक्षाची बांधणी मजबूत करणे, हा या बैठकीमागील उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पंढरपुरात मोठा उलटफेर, भगीरथ भालके यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश
दरम्यान, पंढरपूरच्या राजकारणात मोठा उलटफेर बघायाल मिळत आहे. भगीरथ भालके यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भूमिका मांडली आहे. “जशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, तसेच भगीरथ भालके हे पंढरपूरात विकासाची गंगा नक्की आणतील. त्यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा परिसरात शिवसेनेची ताकद वाढणार असून भालके यांच्या खांद्यावरचा भगवा झेंडा हा फक्त शिवसेनेचा नसून तो भागवत धर्माचा, प्रभू श्रीरामांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेचा आहे. अनिल सावंत आणि तानाजी सावंत यांचा उल्लेख करत काका-पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राने पाहिले आहे, पण हे दोघे शिवसेनेत एकदिलाने काम करतील”, असा विश्वास एकनाथ शिंदेंनी याप्रसंगी व्यक्त केला.
“ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. काही चॅनलवालेच डरकाळी फोडत आहेत. ती ऐकून काही जण म्याव-म्याव करत आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांमुळे आणि भगव्याच्या शानमुळेच दररोज हजारो नेते लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेसोबत जोडले जात आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा