• Mon. Jun 15th, 2026
    हेलिपॅड समजून भुजबळांच्या हेलिकॉप्टरचं पुण्यातील पार्किंग लॉटमध्ये लँडिंग, पायलटची गंभीर चूक, थोडक्यात अनर्थ टळला

    Chhagan Bhujbal Pune Helicopter Landing Accident Avert : कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग करताना पायलटकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगवेळी गंभीर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हेलिपॅड समजून पायलटने चक्क कार पार्किंग लॉटमध्ये लँडिंग केल्याचं पाहायला मिळत आहे. सुदैवाने छगन भुजबळ यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरुप आहेत.

    भुजबळांच्या पायलटची मोठी चूक

    राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग करताना पायलटकडून मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी भुजबळ हे नाशिकहून पुण्याला येत होते. यावेळी गावात हेलिकॉप्टर लँडिंगसाठी हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं. परंतु कार पार्किंग लॉटमध्ये मोकळी जागा पाहून तिथेच हेलिपॅड असल्याचा पायलटचा गैरसमज झाला आणि त्याने तिथे लँडिंग केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार न झाल्याने सर्वजण सुखरुप आहेत.
    Maharashtra TimesDosa Batter Death : आम्ही नवस फेडायला येऊ! डायरीतील एका ओळीने पोलिसांचे डोळे विस्फारले, डोसा पीठ केसची चक्रं फिरली, संशयाच्या फेऱ्यात दोघं

    महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम

    महात्मा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील खानवडी या त्यांच्या मूळ गावी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळ हे सर्वात आधी पोहोचले. त्यावेळी कार पार्किंगमध्ये फारशा गाड्या नव्हत्या. त्यामुळे पार्किंग लॉटमध्ये मोकळी जागा पाहून तिथेच हेलिपॅड असल्याचा समज होऊन पायलटने तिथे हेलिकॉप्टर उतरवले. भुजबळ बाहेर आल्यानंतर तिथून हेलिकॉप्टर हे मूळ हेलिपॅडकडे नेण्यात आले.

    राहुरीत उमेदवार दिला, पवारांवर दुटप्पी, डमी उमेदवार दिल्याचा आरोप का होतोय?

    Maharashtra TimesMathura Boat Accident VIDEO : एका क्षणी ओठी भजनं, पुढच्याच क्षणी किंकाळ्या! मथुरा बोट दुर्घटनाग्रस्तांचा शेवटचा व्हिडिओ समोर

    पायलटवरील कारवाईकडे लक्ष

    दरम्यान, या प्रकाराची गांभीर्याने दखल छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून घेण्यात आली आहे. आता पायलटवर कुठली कारवाई होणार का, प्रशासन काही निर्णय घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. उपमुख्यमंत्रिपदी असताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा बारामती येथे विमान कोसळून अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच जेमतेम अडीच महिन्यात हा प्रकार घडल्याने समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा