Mumbai-Bengaluru Vande Bharat Sleeper: हावडा ते कामाख्या दरम्यान सध्या देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावत आहे. त्यानंतर आता मुंबई ते बंगळुरूदरम्यानही वंदे भारत स्लीपरला मंजुरी मिळाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बंगळुरू ते मुंबईदरम्यान नव्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला मान्यता दिली आहे. केएसआर बंगळूरू ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान ही ट्रेन धावणार आहे. बंगळुरू ते मुंबई या गर्दीच्या रेल्वे मार्गावर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एका रात्रीत प्रवास शक्य
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पी सी मोहन यांना पाठवलेल्या पत्रातून याबद्दल अधिकृत महिती समोर आली आहे. या सेमी हाय-स्पीड ट्रेनमुळे मुंबई ते बंगळुरूदरम्यान अंतर एका रात्रीत पार होणार असून प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेकडून ही रेल्वे गाडी हाताळण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
या स्लीपर ट्रेनचं बांधकाम बीईएमएल (BEML)कडून करण्यात येत आहे. बीईएमएल चेन्नई-स्थित आसीएफकडून वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही ट्रेन बनवणार आहे. ICFकडून नवीन तयार केलेल्या नारंगी आणि राखाडी रंगासारखीच ही वंदे भारत देखील असेल. ही देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर ट्रेन असेल. पहिल्या स्लीपरची सुरूवात जानेवारी 2026मध्ये बंगालमधील हावडा ते गुवाहाटी मधील कामाख्यादरम्यान झाली होती. या स्लीपर ट्रेनमुळे दोन्ही शहरातील प्रवासाचा वेळ अवघ्या 6 तासांवर आला आहे.
डिसेंबरपर्यंत 12 नव्या एक्सप्रेस दाखल
5 एप्रिल 2026 रोजी बंगळुरू सेंट्रलचे खासदार पी.सी मोहन यांना लिहिलेल्या पत्रात, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केएसआर बेंगळुरू रेल्वे स्टेशन आणि सीएसएमटी दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर सेवेला मान्यता देण्याची घोषणा केली होती. 2026च्या सुरूवातीला वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन वाढवण्यात आले असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली होती. त्याप्रमाणे 2026च्या अखेरीस 12 वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होतील. या ट्रेनच्या प्रत्येक बाजूला सहा डबे असतील.
सध्या सुरू असलेल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या सुरूवातीच्या तीन महिन्यांत 119 फेऱ्या पूर्ण झाल्या असून 1.21 लाख प्रवाशांना प्रवास केला आहे. प्रवाशांकडून या ट्रेनला उदंड प्रतिसाद मिळत असून आता मुंबईत सुरू होताच महाराष्ट्रातील नागरिकांनाही या ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा