Mumbai Local Mega Block Update: या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
मध्य रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग : अप आणि डाऊन धीमा
वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५
परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. जलद लोकल फेऱ्या नियमित थांब्यांसह परळ, माटुंगा, शीव स्थानकांवर थांबणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
Marathi Language: मराठी येत नसेल तर रिक्षाचालकांचं लायसन्स होणार रद्द; 1 मेपासून थेट कारवाई, परिवहनमंत्र्यांची माहिती
हार्बर रेल्वे
स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम : सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल आणि सीएसएमटी ते गोरेगाव/वांद्रे मार्गावरील अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. पनवेल ते कुर्लादरम्यान फलाट-८वरून विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
Mumbai Local : मध्य रेल्वे लोकलमध्ये 100 फेरीवाल्यांना अधिकृत मान्यता, तीन वर्षात 1.32 कोटी परवाना शुल्क मिळणार, प्रवाशांचा तीव्र संताप
पश्चिम रेल्वे
स्थानक : सांताक्रुझ ते गोरेगाव
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : सकाळी १० ते दुपारी ३
परिणाम : ब्लॉकवेळेत सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. बोरिवली आणि अंधेरीच्या काही लोकल फेऱ्या गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
