Satara Nira Canal Brother and Sister Bodies Found : सातारा जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. बारामतीतील बहीण-भावाचे पार्थिव कालव्यात आढळले आहेत.
सातारा नीरा कालवा बहीण भाऊ मृतदेह(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुधीर पाटील, सातारा : बारामती तालुक्यातील सख्ख्या बहीण-भावाचे पार्थिव नीरा कालव्यात आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी फलटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघेही बेपत्ता झाल्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीरा कालव्यात त्यांचे पार्थिव आढळून आले. किरण काकासाहेब चोपडे (वय २६) आणि काजल काकासाहेब चोपडे (वय २३, रा. मेखळी, ता. बारामती) अशी त्या बहीण-भावाची नावे आहेत. दरम्यान, हा घातपाताचा प्रकार आहे की दुचाकीसह कालव्यात पडल्यानं त्यांचा मृत्यू झालाय? या दोन्ही शक्यता गृहित धरून नातेपुते पोलीस तपास करत आहेत.
दोघे बेपत्ता असल्याची तक्रार
काजल काकासाहेब चोपडे ही फलटणमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षातील प्रोजेक्टसंदर्भात माहिती घेऊन प्रोजेक्ट असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा म्हणून सांगण्यासाठी भावासोबत आली होती. काम झाल्यानंतर मंगळवारी ७ एप्रिल रोजी दुपारी ते कॉलेजमधून बाहेर पडले. परंतु, घरी पोहचलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.Mumbai News : मुंबईत महापूर आल्यासारखी स्थिती, रस्त्यांना नदीचं स्वरुप, दुकानांमध्ये पाणी शिरलं, नेमकं काय घडलं?
नीरा कालव्यात दोघांचे पार्थिव
बेपत्ता बहीण-भावाचा शोध सुरू असतानाच माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते गुरसाळे हद्दीत नीरा उजवा कालव्यात दोघांचे पार्थिव आढळून आले. नातेपुते पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पार्थिव बाहेर काढून पंचनामा केला. नातेपुते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
Raigad News : नदीत पोहण्यासाठी उतरला, पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाला; गणेशचा सावित्री नदीत करुण अंत
पोलिसांनी काय माहिती दिली?
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘घातपाताची शंका घेण्यासारखी कोणतीच गोष्ट आढळून आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. दोघांच्या शरीरावर कसलीही जखम नव्हती. तसेच त्यांचे मोबाईल देखील कालव्यात सापडले. मोटरसायकलचा शोध सुरू आहे. परंतु, मोटरसायकलसह दोघे कालव्यात पडल्याने ही घटना घडली असावी का? ही शक्यता गृहित धरून देखील आम्ही तपास करत आहोत. मोबाईलचा सीडीआर मिळाल्यानंतर या घटनेवर प्रकाश पडेल’, अशी माहितीही त्यांनी दिली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा