• Fri. Jun 5th, 2026
    Beed Crime : ‘आई-सुरेखा मला माफ करा’; बायकोच्या अन् सासरच्या छळाला कंटाळून बीडच्या तरुणाचं टोकाचं पाऊल, फेसबुक पोस्टमध्ये गंभीर आरोप

    Beed Crime News : बीडमधील एका तरुणाने बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याआधी तरुणाने फेसबुक पोस्ट लिहित बायकोवर आणि एका हॉस्पिटलवर गंभीर आरोप केले आहेत.

    रामेश्वर गव्हाणे फेसबुक पोस्ट आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नागापूर या गावातील तरुणाने सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या जाचास कंटाळून त्याच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत शेतात जाऊन गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. होतकरू असलेल्या तरुणाला एवढं मोठं पाऊल उचलण्यास भाग पाडलेल्या पत्नी आणि सासरच्या मंडळीला आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या लोकांना प्रशासनाने कडक शासन करण्याची मागणी करणारी पोस्ट या तरुणाने लिहित आपलं आयुष्य संपवलं आहे. रामेश्वर गव्हाणे (वय ३०) असं या तरुणाचं नाव आहे.

    फेसबुक पोस्टमध्ये गंभीर आरोप

    मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नागापूर येथील रहिवाशी आसलेल्या रामेश्वर गव्हाणे या तरुणाचा गेल्या दोन वर्षापूर्वी उखळी येथील तरुणी नम्रता जाधव हिच्यासोबत विवाह झाला. विवाह अतिशय साध्या पद्धतीने केल्यानंतर नम्रता रामेश्वर याच्या घरी आली. तेव्हापासून ते आजपर्यंत नम्रताने व तिच्या माहेरच्या मंडळीने रामेश्वर आणि त्याच्या परिवाराला प्रचंड त्रास दिल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या सर्व प्रकारात नम्रता आणि तिच्या माहेरच्या लोकांना परळी येथील प्रसिद्ध डॉक्टर आणि इतर मंडळीचा समावेश असल्याचं या पोस्टच्या माध्यमातून समोर आलं आहे.
    Maharashtra TimesSatara News : कॉलेजमध्ये कामानिमित्त गेले, पुन्हा परतलेच नाही; बारामतीतील बहीण-भावाचे पार्थिव साताऱ्यातील कालव्यात आढळले

    फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलेलं आहे?

    फेसबुक पोस्टमध्ये रामेश्वर याने लिहिलं आहे की, ‘आई आणि सुरेखा मला माफ करा. मी जे गेल्या दोन वर्षांपासून सहन करतो आहे. ते मनाला खूप वेदना देणारे आहे. त्यामुळे मी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. माझ्या बायकोच्या नम्रता जाधव हिच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे’, असं त्याने फेसबुकवर पोस्ट करत रामेश्वर गव्हाणे याने लिहिलं आहे.

    खोटा रिपोर्ट आणि फेक उपचार

    ‘गेल्या दोन वर्षांपासून नम्रता माझा प्रचंड मानसिक छळ करत आहे. सद्या ती म्हणत आहे की, मी गरोदर आहे. सात आठवड्याची गरोदर आहे. तिचे उपचार आई नर्सिंग होम अंबाजोगाई येथे सुरू आहेत. तेथील डॉ. सुनिता तोंडगे यांनी बाळाचं ठोके सुरू झाले आहेत, असं आजच म्हटलं आहे. तसा रिपोर्ट दिला आहे. पण तो खोटा रिपोर्ट आणि फेक उपचार त्या करत आहेत. डॉक्टरांना मॅनेज करून माझी बायको माझी फसवणूक करत आहे. वर्षा मराठे गव्हाणे यांनी तिला या कामात मदत केली आहे. परळीच्या गुघे मॅडम, डॉ. सुनिता तोंडगे आणि डॉ. गणेश तोंडगे यांच्याकडे सेटिंग लावून ती माझी फसवणूक करत आहे. कारण उद्या जर मी कोर्टात धाव घेतली तर म्हणता येतं मुल राहिलं होतं, नंतर गर्भपात झाला. म्हणजे वंध्यत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ती परत आली आहे‌. त्यामुळे आजच माझ्या बायकोची सोनोग्राफी करावी आणि आरोग्य विभागात सुरू असलेला गैरप्रकार थांबवावा ही नम्र विनंती. या प्रकरणातील खोटे रिपोर्ट देणाऱ्या सर्व डॉक्टरांवर सखोल चौकशी करून कारवाई करावी.
    Maharashtra TimesRaigad News : नदीत पोहण्यासाठी उतरला, पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडाला; गणेशचा सावित्री नदीत करुण अंत

    माझ्या जेवणात मीठ, चटणी जास्त टाकते

    ‘यापूर्वीही ती मला मारहाण करून उखळीला गेली होती. तिने मला मारहाण केली तरी मी तिला काहीही केलं नाही. तिला माझ्याकडून पैसे घेऊन जायचे आहेत. याआधीच तिची मावशी आणि काका यांनी सोन्याचे ओरीजनल दागिने घेऊन गेले आहेत आणि हुबेहूब सोन्यासारखे दागिने तयार करून माझ्या घरी आणून ठेवले आहेत. माझ्यावर सोन्याच्या चोरीचा आळ घालून किंवा इतर काही तरी कारणाने माझ्याकडून पैसे काढून घ्यायचे आहेत. रात्री मी झोपेत असताना मला घाबरवण्यासाठी अंगाला टच करते. चिमकुरे घेते, माझ्या जेवणात मीठ, चटणी, मसाला जास्त टाकते अजून दुसरं काही तरी मिक्स करते‌, ज्यामुळे मला काहीच कळत नाही काय होत आहे’.

    आईला नेहमी शिळीच भाकरी खावी लागली

    ‘गेल्या दोन वर्षांपासून माझा अपमान करणं, मला शिव्या देणं, मला उचकावणं, माझ्यासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं करणं, स्वयंपाक जास्त करून ठेवणं. ज्यामुळे आईला नेहमी शिळीच भाकरी खावी लागल्यामुळे तिला पोटात दुखू लागले. सुरूवातीला सुरेखालाही खालीवर पाहत होती. मात्र, तिने फरशी पुसायचं औषधं पिल्यापासून तिने तिला त्रास देणं कमी केलं. हा माझा छळ सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत माझे नातेवाईक आहेत ते माझ्याकडून बोलत पण नाहीत, कारण मी त्यांना जाब विचारला आहे. इतर कोणी मध्ये पडत नाही. त्याबरोबर त्यांनी फसवणूक केल्यामुळे त्यांना मला कसा त्रास होईल आणि मी कसा अडचणीत सापडेल किंवा मला जाळ्यात कसं पडायचं यासाठी ते प्रयत्नशील होते. यात त्यांनी माझे मित्र गळाला लावले. मोबाईल फोन हॅक करणे असे प्रकार केले असू शकतात. मला त्रास द्यायचा, भडकवायचे आणि दुसरीकडून मी भडकलो की रेकॉर्डिंग करून घ्यायचे, असे अनेक प्रकार त्यांनी केले आहेत. कारण ते सराईत आहेत. त्यांना त्यांचं पितळ उघडे पडू द्यायचे नाही. त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ते माझ्या मागे घात धुवून लागले आहेत’.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar : पाय सोलपटले तरीही वर्दीसाठी धावला, नितीनची अंगावर काटा आणणारी कहाणी, पोलीस अधिकाऱ्याने नवे बूट दिले; VIDEO

    असं लग्न करून केली फसवणूक

    ‘दोन वर्षांपूर्वी लबाड लांडग्यांनी एकट्यात गाठून हरणाची शिकार केली‌. ज्ञानोबा जाधव, सुमित्रा जाधव, प्रल्हादराव शिंदे, शिवाजी शिंदे, पंढरी शिंदे, बबन शिंदे, सुभानराव शिंदे यांनी माझ्या इतर नातेवाईकांना मामा, गावातील लोकांना मध्ये न पडू देता किंवा मला म्हणाले की, मोठं लग्न करण्यात उगाच पैसे खर्च करण्याऐवजी छोटं लग्न, करू असं म्हणून त्यांनी मला इतर नातेवाईकांना किंवा माझ्या गावातील लोकांना मध्ये सहभागी न करता माझं लग्न जमवलं. कारण यांना मुलीच्या मेडिकलविषयी सगळी माहिती म्हणजे या मुलीला मुल होत नाही याविषयी माहिती होती. ती माझ्यापासून लपवून माझी फसवणूक करून नम्रता जाधव आणि माझा विवाह लावला. याप्रकरणी वरील नावे घेतलेली मंडळी ही पडद्यासमोर होते. तर पडद्याच्या मागे बालासाहेब सावंत हा माझ्या बायकोचा नातेवाईक आहे, आणि नवीन मराठे, वकील प्रकाश मराठे, वर्षा मराठे गव्हाणे हे होते. वरील तिघेही लग्न लावायला सुध्दा आली नव्हती. तर वर्षा मराठे गव्हाणे या लग्नाला होत्या. हे पडद्यामागचे कलाकार का म्हटलं आहे, कारण त्यांचा माझ्यावर राग होता’.

    मला संपवण्यासाठी कटकारस्थान

    ‘माझ्या लग्नामुळे त्यांच्या जावायाला म्हणजे माझ्या भावाला त्यांच्या मनाप्रमाणे शेती वाटून द्यायची होती. मी त्यात मुख्य अडथळा होतो. त्यामुळे मला संपवण्यासाठी त्यांनी हे कटकारस्थान रचले. मी त्यांचं ऐकत नसल्याने मग त्यांनी मध्यस्थी करण्याची जबाबदारी मसला येथील प्रल्हाद शिंदे, आदींना दिली‌. नंतर लग्न झाल्यानंतर माझी बायको हे घर मला माझं वाटत नाही. मला इथं राहायचं नाही, असं मला बोलत होती. माझ्यासोबत वाद घालून तिचा बाप आणि भाऊ वारंवार घेऊन जात होते. थोड्या दिवसांनंतर कळलं की तिला मासिक पाळी येत नाही. तिला २००९ पासून हा प्रॉब्लेम आहे. मुलं होण्यासाठी पाळी नियमित करून उपचार सुरू करू म्हटलं, तरी माझ्यासोबत दवाखान्यात येत नव्हती‌. आली तरी म्हणायची इथले दवाखाने चांगले नाहीत. त्यामुळे मी दावाखान्यात येणार नाही’.
    Maharashtra TimesCrime News : तरुणाच्या खिशातून हातचलाखीने iPhone 16 Pro काढला अन् निवांत निसटला, नागपूरच्या बस स्थानकावर थरारक चोरी

    असह्य वेदना मी सहन करून कंटाळलो

    ‘मी माझी बायको आणि तिच्या घरच्यांना कंटाळलो आहे. त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण माझी बायको मला म्हणाली आहे. तुला मी कधीच नीट जगू देणार नाही. माझ्यामागे माझे आणि तुझे नातेवाईक आहेत‌. मी पैसे आणि शेती तर तुझ्याकडून घेऊनच जाणार आहे‌. शिवाय तुला पुढचं आयुष्य खोट्या केसेस करून कोर्ट कचेरी आणि जेलची हवा खावी लागेल. त्यामुळे मी कंटाळून हे पाऊल उचलत आहे. तरी माझी विनंती आहे की, या लोकांना कायद्याने कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण त्यांनी माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. पोलीस प्रशासन, सुज्ञ नागरिकांना मी विनंती करतो की, मला मेल्यानंतर तरी न्याय द्या. मला न्याय मिळाला तर यापुढे माझ्यासारख्या एखाद्या निष्पाप मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही आणि त्याला माझ्यासारखी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये. भैय्या आई आणि सुरेखाची काळजी घे. मला माहिती आहे मी आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाहीत. पण मला होणाऱ्या असह्य वेदना मी सहन करून कंटाळून गेलो आहे.

    दरम्यान, रामेश्वर गव्हाणे या तरुणाने प्रशासनाला विनंती केली आहे आणि या सर्व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. या घटनेची माहिती मिळताच परळी येथील ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा