• Fri. Jun 5th, 2026
    Solapur Crime : अवघ्या चौदाव्या वर्षी लग्न, 4 महिन्यांत बालिकेने आयुष्याची दोर कापली, पती-सासरा अटकेत, सोलापूरमधील प्रकरणाने खळबळ

    Minor girl ended life in Mangalwedha : मंगळवेढ्यात १४ वर्षीय मुलीचा बालविवाह लावून दिल्यानंतर अवघ्या ४ महिन्यातच तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप असून, मंगळवेढा पोलिसांनी पती आणि सासऱ्याला अटक केली आहे.

    अवघ्या चौदाव्या वर्षी लग्न, 4 महिन्यांत बालिकेने आयुष्याची दोर कापली, पती-सासरा अटकेत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर: एकीकडे आपण २१ व्या शतकातील प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे बालविवाहाचा विळखा अद्यापही सुटलेला नाही, हीच भीषण वास्तविकता समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली असून, अवघ्या १४ वर्षांच्या एका चिमुरडीने लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच मृत्यूला कवटाळले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, “कायद्याचा धाक उरलाय की नाही?” असा सवाल आता विचारला जात आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    मंगळवेढा तालुक्यातील बावची आणि निंबोणी परिसरातील ही दुर्दैवी घटना आहे. अवघ्या १४ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा चार महिन्यांपूर्वी बालविवाह लावून देण्यात आला होता. खेळण्या-बागडण्याच्या वयात या मुलीच्या खांद्यावर संसाराचं ओझं टाकण्यात आलं. मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच सासरच्या मंडळींनी तिची छळवणूक सुरू केली.

    सासरचा छळ आणि टोकाचं पाऊल

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या १४ वर्षीय नवविवाहितेचा सासरी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. ज्या वयात शिक्षणाची स्वप्नं पाहायची, त्या वयात तिला सासरच्या जाचाला सामोरे जावे लागले. अखेर या जाचाला कंटाळून तिने आपली जीवनयात्रा संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेच्या वृत्ताने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

    Maharashtra TimesLadki Bahin Yojana : ‘पैसे नसतील तर योजना थांबवा’; लाडकी बहीण योजनेवरुन उच्च न्यायालयानं सरकारला सुनावलं

    पती अन् सासरे गजाआड

    या घटनेची गंभीर दखल मंगळवेढा पोलिसांनी घेतली आहे. मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत पीडित मुलीचा पती आणि सासरा यांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
    या निमित्ताने पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ते म्हणजे १४ वर्षांच्या मुलीचा बालविवाह झालाच कसा? गावातील जबाबदार नागरिकांना याची माहिती नव्हती का? एका कोवळ्या जीवाची आहुती दिल्यावरच यंत्रणा जागी होणार का? बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे असूनही, छुप्या पद्धतीने होणारे हे विवाह कोवळ्या मुलींच्या जीवावर बेतत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा