Nashik Company Conversion Racket :नाशिकमध्ये एका नामांकित कंपनीत नोकरी करणाऱ्या आठ तरुणींसोबत जवळीक साधून एकीवर अत्याचार, तिच्यासह एका तरुणावर बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न झाला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीत धार्मिक कट्टरतेचे एक भयानक जाळे सक्रीय असल्याचे समोर आले आहे. विशिष्ट धर्माच्या तरुण-तरुणींनी एकत्रित येत इतर धर्मीय तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याची योजना आखली. ती यशस्वी करण्यासह धार्मिक कट्टरतेसाठी व्हॉट्सॲपवर एक खास गट कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.
आठ तरुणींसोबत जवळीक
नाशिकमध्ये एका नामांकित कंपनीत नोकरी करणाऱ्या आठ तरुणींसोबत जवळीक साधून एकीवर अत्याचार, तिच्यासह एका तरुणावर बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी नऊ गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांत आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी, दानिश शेख ‘एसआयटी’च्या कोठडीत असून, निदा खान हिचा शोध सुरू आहे. बहुराष्ट्रीय कंपनीत विशिष्ट धर्मातील तरुण-तरुणींचा व्हॉट्सॲप ग्रुप सक्रीय होता. त्यावर कंपनीतील गटबाजीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा होत असे. कदाचित त्यातूनच ‘पुढचे लक्ष्य काय’ हे ठरत असावे, असा कंपनीतील पीडित तरुणींना संशय आहे.
गंभीर बाब म्हणजे, ज्या तरुणींना जाळ्यात ओढले जायचे, त्यांचा पुन्हा स्वतंत्र व्हॉटसॲप ग्रुप तयार होत असे. यापूर्वी एका तरुणीने ‘त्या’ गटात काम केले. मात्र, कामानिमित्त तिने एका मोठ्या शहरात बदली करून घेतली. फक्त तरुणच नव्हे, तर तरुणीही या कृत्यात सहभागी असल्याने कट आखून विनयभंग, अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा संशय ‘एसआयटी’ तपासात व्यक्त होत आहे. Crime News : प्रेमसंबंधांना विरोध, ‘पोक्सो’त अटक; सागर ठाकरेने टीशर्टने पोलीस कोठडीत जीव दिला, कुटुंबाला भरपाई मिळणार
‘फ्लर्टिंग, जेवण आणि…’
संशयित कंपनीत कायमच ‘सिंगल’ असल्याचे दर्शवून तरुणींसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे. तरुणींचे कौतुक करून, गोड बोलून त्यांच्यासोबत ‘फ्लर्टिंग’ करायचे. नंतर त्यांना जेवणासाठी बाहेर नेत.
तरुणींसोबत संशयित सातत्याने चर्चा करून त्यांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करायचे. ‘तुला रजा मिळवून देतो. तुझी ऐच्छिक ठिकाणी बदली करून देतो,’ असे सांगत सलगी करायचे. ज्या तरुणी मदत घेण्याचा प्रयत्न करायच्या, त्यांना जाळ्यात ओढले जायचे. मात्र, बहुतांश तरुणींनी वेळीच संशयितांचा हेतू ओळखून त्यांना झिडकारले. काही तरुणींनी नोकरीचा राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. Crime News : पहिल्या नवऱ्याने जीव दिला, पूजा गावंडेने पुन्हा लग्न केलं, दुसऱ्या नवऱ्याने जीव घेतला, दीड महिन्यापूर्वी काय घडलं? तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी, दानिश शेख मुख्य सूत्रधार शफी याने अनेक तरुणींची छेड काढली निदा खान हिने तरुणींसोबत सलगी करण्यासाठी इतरांना मदत केली निदा हिने तरुणींना ‘हिजाब’बद्दल सांगितले; तिच्या ओळखीतून इतर संशयित मैत्री करायचे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा