Vidarbha Flood News: पर्लकोटा आणि पामुलागौतम नद्यांना पूर आल्यामुळे शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला पाण्याचा वेढा पडला.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यात सती नदीत बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यात पुरात वाहून दोघांचा, तर मासे पकडताना एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे धाम नदीत एक युवक वाहून गेला. भंडारा जिल्ह्यात कालव्यात पडून एका शेतकऱ्याचा, तर यवतमाळ जिल्ह्यात नाल्याच्या पुरात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
Pratap Sarnaik: राज्यात लवकरच रुग्णवाहिका धोरण; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील राणी खेडेगाव येथे शनिवारी दुपारी आई-वडील धान रोवणीच्या कामासाठी शेतात गेले असताना गावातील चार मुले सती नदीवर आंघोळीसाठी गेली. यावेळी नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली होती. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघे खोल पाण्यात गेले आणि बुडाले. चौथा मुलगा सुदैवाने बचावला. लक्ष्मण सुन्हेर दूधकवर (वय ६), कुणाल रमेश दूधकवर (वय ५) आणि मोहित हिवराज सराटे (वय ११) अशी मृतांची नावे आहेत.
बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील इसापूर येथील फुलकराम जानकीराम काळे (वय ५०) आणि जळगाव शहरातील सिद्धार्थनगरमधील रहिवासी महादेव जगदेव वाघोदे यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ शिवारात बेंबळा नदीपात्रात मासे पकडताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. त्यात वाहून गेल्याने सूरज तेरसिंग भाबर (वय २६) याचा मृत्यू झाला.
Raj Thackeray: दरवर्षी अठरा कोटींची दानचोरी; सिद्धिविनायक मंदिराबाबत राज ठाकरेंचा गंभीर आरोप
वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील धाम नदी परिसरात पाय घसरून गायमुख कुंडात पडल्याने प्रशांत प्रभाकर माणुसमारे (वय ३५) हा युवक बुडाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे शेतात जाताना चिखलात पाय घसरून कालव्यातील खड्ड्यात पडल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद ईश्वर ठाकरे (वय ३०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
यवतमाळ तालुक्यातील खैरी गावातील एका शेतकऱ्याचा नाल्याच्या पुरात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मारोती अय्या आत्राम (वय ४८) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
Tukaram Mundhe : 21 वर्षांपूर्वी अमरावतीत भाषण केलं, प्रेरित होऊन चौथीतली विद्यार्थिनी UPSC उत्तीर्ण झाली, तुकाराम मुंढेंनी सांगितला किस्सा
पावसाचा जोर ओसरणार
गेल्या आठवड्यात विदर्भाच्या बहुतांश भागांत दमदार हजेरी लावल्यानंतर पुढील काही दिवस पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली असली, तरी धरणांच्या पाणीसाठ्यात अद्याप समाधानकारक वाढ झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
