• Sun. Jun 14th, 2026

    Nagpur Accident News: नातीच्या बर्थडे पार्टीहून परतताना काळाचा घाला! मद्यधुंद बँक व्यवस्थापकाच्या कारनं चिरडलं, आजी-आजोबाचा मृत्यू

    Nagpur Accident News: नातीच्या बर्थडे पार्टीहून परतताना काळाचा घाला! मद्यधुंद बँक व्यवस्थापकाच्या कारनं चिरडलं, आजी-आजोबाचा मृत्यू

    Nagpur Accident News: बर्थ डे पार्टीहून परतताना झालेल्या भीषण अपघातात एका दाम्पत्याचा कारखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    कारच्या धडकेत दाम्पत्य ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: मद्यधुंद बँक व्यवस्थापकाने बेदरकार कार चालवल्याने एका दाम्पत्याचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना बेसा परिसरात घडली. विजय भगवान सावरकर (वय ५३) व सुरेखा विजय सावरकर (वय ४८, रा. हरीहरनगर, बेलतरोडी), अशी मृतांची नावे आहेत. पंकज बाळकृष्ण डेकाटे (वय ४७, रा. न्यू नरसाळा, हुडकेश्वर), असे कारचालकाचे नाव आहे.

    प्राप्त माहितीनुसार, विजय यांचे जावई नितीन सुरेश कळंबे (वय ३०) दिघोरीतील आराधनानगर येथे राहतात. बुधवारी नितीन यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आराधनानगरमधील आहान सेलिब्रेशन हॉल येथे होता. सावरकर दाम्पत्य कार्यक्रमाला गेले. मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपून ते एमएच ४० एक्स ४५०६ क्रमांकाच्या मोपेडने घरी जात होते.

    Maharashtra TimesNagpur News : 200 सीसीटीव्ही, अनेक गाड्यांची झडती, चोराच्या मनात चांदणे, धावला अन् अडकला, पोलिसांची सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या
    बेसा चौक ते पुरुषोत्तम बाजार चौकदरम्यान डेकाटे हा एमएच ४९ बीडब्ल्यू ४२२६ क्रमांकाची कार भरधाव वेगाने चालवीत येत होता. तो मद्यधुंद होता. याचदरम्यान डेकाटे याच्या मोबाइलवर कोणीतरी संपर्क साधला. त्याने मोबाइल बघितला. यादरम्यान त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची भरधाव कार समोरून येत असलेल्या मोपेडवर आदळली. यात मोपेडवरील सावरकर दाम्पत्य खाली पडून जखमी झाले. कार व मोपेडचा समोरील भाग चक्काचूर झाला. अपघातानंतर डेकाटे हा तेथून पळाला. काही अंतरावर लपला.

    माहिती मिळताच बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी शोध घेऊन डेकाटे याला अटक केली.
    Maharashtra TimesNagpur News : 15 जिलेटीन कांड्या, 58 डिटोनेटर, नागपुरात संवेदनशील भागात विस्फोटकांचा साठा सापडला
    तर दुसऱ्या एका घटनेत, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने लातूरवरून केजच्या दिशेने प्रवास करीत होते. कारमध्ये ते एकटेच होते. रेणापूर फाट्याजवळ वळणावर कारवरील त्यांचे नियंत्रण सुटून कार पलटी झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा