• Tue. Jun 16th, 2026
    Pune Crime : एकट्यात गाठून आधी बेदम मारहाण, नंतर बेछूट गोळीबार; पुण्यात जुन्या वादातून मोठी घटना

    Pune Vadgaon Firing News : पुण्यात पुन्हा एकदा एक मोठी घटना समोर आली आहे. एका तरुणावर एका टोळक्याने गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

    वडगाव तरुणावर गोळीबार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनेनं हादरला आहे. चरवड वस्ती येथील मोकळ्या मैदानात एका अल्पवयीन तरुणावर एका टोळक्याने थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरज गायकवाड असं जखमी तरुणाचं नाव असून आरोपींनी त्याच्यावर थेट गोळीबार केला. या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

    आधी मारहाण नंतर गोळीबार

    या प्रकरणात सोहम खामकर, आर्यन जोगडे, मनोज गीते, प्रेम जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी मिळून हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पूर्वाश्रमीच्या वादातून हा हल्ला करण्यात आला. आरोपींनी आधी सुरज गायकवाड आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे. भरदिवसा मोकळ्या मैदानात घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आरोपींचा शोध सुरू असून लवकरात लवकर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
    Maharashtra TimesCongress Baramati Election : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळांची अधिकृत माहिती, सुनेत्रा पवारांसाठी मार्ग मोकळा
    दरम्यान, याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

    मालकाच्या विकृतीने संताप

    पुण्यासारख्या शहराला शिक्षणाचं माहेरघर म्हणून समजलं जातं, पण आता ते गुन्हेगारीचं माहेरघर झालं आहे. अशीच एक संतापजनक घटना पुण्यात पुन्हा उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कामशेतमधील ‘मुकेश फॅन्सी कॉर्नर’ या कपड्यांच्या दुकानात काही तरुणी कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. कपडे खरेदी केल्यानंतर त्यांना ते ट्राय करायचे होते.
    Maharashtra TimesSatara Accident : हॉस्पिटलमध्ये वडिलांना भेटायला जाताना काळाची झडप, कमावत्या लेकाचा अपघाती मृत्यू; दीड वर्षाच्या लेकराचं पितृछत्र हरपलं
    स्टोअररूममध्ये मालकाने CCTV कॅमेरा बसवलेला होता आणि याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तरुणी कपडे बदलत असतानाच अचानक लाईट गेली आणि त्याचवेळी CCTV कॅमेऱ्याची रेड लाईट दिसली. यामुळे त्या तरुणींना संशय आला आणि त्यांनी आजूबाजूला पाहिलं असता तिथे कॅमेरा असल्याचं स्पष्ट झालं.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा