• Sun. Aug 9th, 2026

    Thane News: लाडक्या बहिणी ‘निराधार’! ऑपरेटरच्या चुका, सिस्टीममधील घोळामुळे आधार कार्ड तूर्त स्थगित

    Thane News: अशिक्षित, अल्पशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना या दुरुस्त्यांसाठी मुंबईच्या चकरा मारण्यास सांगितले जात असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    जान्हवी पाटील, ठाणे: ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘कागदमुक्त कारभार’ यांचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात शासकीय यंत्रणेतील त्रुटींमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फटका बसत आहे. शहापूर तालुक्यात आधार कार्डमधील चुकीच्या जन्मतारखा, नावातील बदल आणि पत्त्याच्या विसंगतींमुळे ४५ वर्षांवरील अनेक महिला संजय गांधी निराधार योजना, रेशन, पेन्शन आणि इतर शासकीय लाभांपासून वंचित राहत असल्याचे समोर आले आहे.

    सन २००८मध्ये आधार नोंदणी सुरू झाली, त्यावेळी अनेक ग्रामीण महिलांच्या वयाची नोंद ऑपरेटरकडून अंदाजाने करण्यात आल्याचा आरोप आहे. आता आधार कार्डावरील जन्मतारीख आणि शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जन्मतारीख यामध्ये तफावत आढळत असल्याने लाभांचे अर्ज अडकत आहेत.

    Maharashtra TimesTukaram Mundhe: आता मोर्चा मद्य, चायनीज पदार्थांकडे! ‘एफडीए’च्या पुढील कारवाईबाबत तुकाराम मुंढे यांचे सूतोवाच१९९०पूर्वी जन्मलेल्या अनेक महिलांची जन्मनोंद उपलब्ध नसल्याने त्यांना न्यायालयामार्फत ‘विलंबित जन्म नोंदणी’ प्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ, खर्चिक आणि सर्वसामान्य महिलांच्या आवाक्याबाहेरची आहे. काही प्रकरणांमध्ये महिलांना आधी माहेरच्या नावाने वयाचे गॅझेट करून नंतर सासरच्या नावाने आधार बदलण्याचा सल्ला दिला जात असल्याचे सांगितले जाते. नाव आणि जन्मतारीख लागोपाठ बदलल्याने यूआयडीएआयच्या सिस्टीममध्ये संशय निर्माण होतो आणि संबंधित आधार कार्ड ‘होल्ड’वर जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. परिणामी, अनेक महिलांचे आधार कार्ड गेल्या काही महिन्यांपासून अडकून पडले आहे.

    Maharashtra TimesPune Crime : पुण्यात माणुसकीला काळीमा! चारित्र्यावर संशय, संगनमत करुन सासरच्यांसह पतीने गरोदर बायकोला डेटॉल पाजलंशहापूर तालुक्यातील पत्त्यांच्या नोंदींमध्येही मोठा घोळ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. टपाल विभागाने सन २०१३नंतर शहापूरचा जुना पिनकोड ४२१३०१ कल्याणसाठी वापरात आणला, तर शहापूरसाठी ४२१६०१ हा नवीन पिनकोड लागू झाला. मात्र आधार प्रणालीत हा बदल पूर्णपणे अद्ययावत न झाल्याने पत्त्यांमध्ये विसंगती निर्माण होत असल्याची तक्रार आहे. यामुळे बँकांचे एटीएम, विमा पत्रे आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे परत जात असल्याचे नागरिक सांगतात.

    जिल्हाधिकारी कार्यालयाने तालुका पातळीवर विशेष आधार सुधारणा शिबिरे आयोजित करावीत, ‘एक्सेप्शन केस’ म्हणून अशा प्रकरणांची तातडीने दखल घेऊन सुधारणा कराव्यात, तसेच टपाल विभाग आणि आधार विभागाने पिनकोड व पत्ता नोंदींचे डेटा सिंकिंग करावे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास हजारो पीडित महिलांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल. – उमेश हुलावले, सामाजिक कार्यकर्ते, शहापूर

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा