• Mon. Jun 15th, 2026

    Pune News: पुण्यात तरुणींना खरेदीवेळी कपडे बदलताना ट्रायल रुममध्ये लाल लाईट दिसली, नंतर धक्कादायक प्रकार उघड; मालकाच्या विकृतीने संताप

    Pune News: पुण्यात तरुणींना खरेदीवेळी कपडे बदलताना ट्रायल रुममध्ये लाल लाईट दिसली, नंतर धक्कादायक प्रकार उघड; मालकाच्या विकृतीने संताप

    Pune Crime: या घटनेनंतर पीडित तरुणींनी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    पुण्यात कपडे खरेदीला गेल्यानंतर तरुणींना धक्कादायक अनुभव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड: पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. कामशेतमधील ‘मुकेश फॅन्सी कॉर्नर’ या कपड्यांच्या दुकानात काही तरुणी कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. कपडे खरेदी केल्यानंतर त्यांना ते ट्राय करायचे होते. मात्र दुकानात ट्रायल रूमची सोय नसल्याने दुकान मालकाने त्यांना स्टोअररूममध्ये जाऊन कपडे बदलण्यास सांगितले. सुरुवातीला हा एक साधा प्रकार वाटला, पण पुढे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं.

    स्टोअररूममध्ये मालकाने CCTV कॅमेरा बसवलेला होता आणि याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. तरुणी कपडे बदलत असतानाच अचानक लाईट गेली आणि त्याचवेळी CCTV कॅमेऱ्याची रेड लाईट दिसली. यामुळे त्या तरुणींना संशय आला आणि त्यांनी आजूबाजूला पाहिलं असता तिथे कॅमेरा असल्याचं स्पष्ट झालं. हा प्रकार लक्षात येताच तरुणींनी तीव्र संताप व्यक्त केला, आरडाओरडा केला आणि तात्काळ दुकानातून बाहेर पडल्या. तक्रारीनुसार, आरोपी दुकान मालकाने उलट त्यांनाच धमकावण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलं आहे.

    पोलिसांनी आरोपी मुकेश मुथा याला अटक केली आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 77 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र, इतक्या गंभीर प्रकरणात आरोपीला लवकरच जामीन मंजूर झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात आणखी काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. घटना 16 मार्च रोजी घडली असताना गुन्हा नोंदवण्यात विलंब का झाला? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला का? पोलिसांवर होत असलेल्या आर्थिक व्यवहाराच्या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे? हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

    दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे. मात्र या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा आणि गोपनीयतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. CCTV सारखी सुरक्षा यंत्रणा जर अशा प्रकारे वापरली जात असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारांना आळा बसेल, अशी भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा