Baramati Election News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची आज सकाळी भेट घेतली. भेटीदरम्यान पवार यांनी सपकाळ यांना काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली.
बारामती पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. मात्र काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीला काही तास बाकी असताना काँग्रेसची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “पक्षनेतृत्वाचा निर्णय मला मान्य राहील. मात्र आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माघार घेण्याबाबत, मला अद्याप संपर्क केलेला नाही, किंवा काहीही सूचना दिलेल्या नाहीत. सपकाळ यांचा मला सकाळी फोन आला होता. आपल्याला लढायचंय असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु त्यानंतर नवीन काय निर्णय आहे, त्याबाबत ते मला माहिती देतील. हर्षवर्धन सपकाळ हे राज्यात आता आमचे बॉस आहेत आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील,” असं मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.
उमेदवारीबद्दल पुढे बोलताना आकाश मोरे म्हणाले की, “लोकांमधून आपल्या उमेदवारीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र हा प्रतिसाद सकारात्मक असताना आपल्याला लोकांच्या भावनाही जपायच्या आहेत. हे सगळं मी वरिष्ठांना कळवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय तुम्ही घ्या, त्या निर्णयास मी बांधिल राहीन. लोकांच्या भरपूर समस्या आहेत, त्यामुळे निवडणूक लढवावी, यासाठी मला बारामती तालुक्यातून भरपूर फोन आणि मेसेजेस येत आहेत,” असा दावा आकाश मोरेंनी केला आहे.
वडेट्टीवार मीडियासमोर येऊन काय बोलले?
एकीकडे आपण माघार घ्यायची आहे की अर्ज कायम ठेवायचा आहे, याबाबत काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांना अद्याप पक्षाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेस आपला उमेदवारी अर्ज मागे घेईल, असं मीडिसमोर येऊन जाहीरपणे सांगितलं . वडेट्टीवार यांच्या विधानाने काँग्रेसमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.
शरद पवारांचा खरगेंना फोन?
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत माघार घ्यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शरद पवारांच्या आवाहनाला काँग्रेस प्रतिसाद देणार का, हे काही वेळात स्पष्ट होणार आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा