• Tue. Jun 9th, 2026

    Mumbai-Pune Missing Link: मिसिंग लिंकवर ‘लोड टेस्टिंग’ सुरू, मार्ग आता अंतिम टप्प्यांत; मे महिन्यापर्यंत काम पूर्ण

    Mumbai-Pune Missing Link: मिसिंग लिंकवर ‘लोड टेस्टिंग’ सुरू, मार्ग आता अंतिम टप्प्यांत; मे महिन्यापर्यंत काम पूर्ण

    Missing Link Update: पुणे-मुंबईदरम्यान 13 किमी लांब मिसिंग लिंकचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. मार्गावर सुरक्षेसाठी चाचण्या सध्या सुरू केल्या असून काही किरकोळ कामं पूर्ण होताच मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: मुंबई-पुणे मिसिंग लिंक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. हा बहुप्रतिक्षित मार्ग येत्या मे महिन्यापर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा असून सध्या या मार्गावर लोड टेस्टिंग सुरू झालं आहे. सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण होताच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईतून पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    लवकरच काम पूर्ण

    मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे दोन्ही भाग जोडले गेले आहेत. खोल खाडीवर उभारलेल्या या केबल-स्टेड पुलावर वाहतुकीची नियमित चाचणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई आणि पुण्याच्या दिशेने येणाऱ्या दोन्ही पुलांवर कामं पूर्ण झाली आहेत. हा प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून एप्रिलअखेरपर्यंत काम संपवण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट आहे.Maharashtra TimesMumbai Metro 9: दहिसर-काशीगाव मेट्रोला सुरूवात! इंटरचेंजद्वारे कुलाबा, विमानतळापर्यंत प्रवास शक्य; दुसरा टप्पा लवकरच

    खोपोली आणि कुसगावदरम्यान, हा संपूर्ण 13.3 किमी लांब मार्ग उभारण्यात आला आहे. लोणावळा आणि खंडाळा घाटादरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा मार्ग उभारण्यात आला आहे. मिसिंग लिंक सुरू होताच मुंबई ते पुणेदरम्यान प्रवास 25 ते 30 मिनिटांत होणार आहे. पावसाळ्यातही काम सुरू ठेवल्यामुळे वेळेत काम संपवता आले अशी माहिती वरिष्ठ अधिकारी अनिल गायकवाड यांनी फ्री प्रेस जरनलशी बोलताना दिली आहे.

    किरकोळ कामं शिल्लक

    मिसिंग लिंकच्या मार्गावर सध्या दोन जुले बोगदे आणि एका मोठा केबल-स्टेड पूलाचा समावेश आहे. रस्त्याचं काम नुकतच पूर्ण झाल्यामुळे आता लोड टेस्टींग म्हणजेच, भार तपासणीचं काम सध्या सुरू करण्यात आलं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहानांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहतूककोंडीसह अनेकवेळा अपघातही होतात. त्यामुळे हे पूल सर्व अवजड वाहनांचा भार उचलण्यासाठी सक्षम आहेत याची तपासणी करणं गरजेचं आहे. याशिवाय सध्या मार्गावर दिशादर्शक फलकं, बॅरिअर आणि पेंटिंगसारखी किरकोळ कामं बाकी आहेत.

    Maharashtra TimesPune News: पुण्यातील 12 ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांना गती, बाणेर-पाषाण लिंक रोड पूर्ण होणार; 30 वर्षांपासून रखडलेला मार्ग अंतिम टप्प्यात

    दरम्यान, मिसिंग लिंक खुला होताच सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी फक्त हलक्या वाहनांना मार्गावर वाहतुकीची परवानगी असणार आहे. त्यापुढील तीन महिने अवजड आणि प्रवासी वाहनांना परवानगी दिली जाईल. सहा महिने वाहतुकीचा प्रवाह तपासल्यानंतर व्यावसायिक वाहनांच्या परवानगीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा