२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडणारे कोल्हापूरमधील वजनदार नेते समरजीत घाटगे यांनी आता पुन्हा भाजपात परतण्याचा निर्णय घेतलाय. समरजीत राजेंचा हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असतानाही समरजीत घाटगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होते, असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं.