राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि दिवंगत नेते अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेचे राजकारणात पडसाद उमटू लागलेत. आधी पार्थ पवारांनी बारामती पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचं म्हटलं होतं. यानंतर काँग्रेसनेही धड भाषणही देता न येणारा मुलगा असं म्हणत पार्थ पवारांवर बोचऱ्या शब्दांत पलटवार केला होता. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं मत व्यक्त करत काँग्रेसला सुनावलंय.