• Sun. Jun 7th, 2026

    Nashik Kumbh Mela: सिंहस्थाच्या कामांत कमिशनखोरीच्या चर्चेचा धूर; हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, लाचखोर विलास लाडची Audio Clip व्हायरल

    Nashik Kumbh Mela: सिंहस्थाच्या कामांत कमिशनखोरीच्या चर्चेचा धूर; हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, लाचखोर विलास लाडची Audio Clip व्हायरल

    Vilas Lad Audio Clip Viral: संबंधित व्यक्तीला ‘तुमच्या ओळखीचे लोक असतील तर त्यांनाही टेंडर मिळवून देऊ,’ असेही आश्वासन दिल्याचेही क्लिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

    विलास लाड ऑडिओ क्लिप व्हायरल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिकमध्ये सन २०२७ मधील सिंहस्थाची कामे राज्याबाहेरील ठेकेदारांना दिल्याचा आरोप होत असतानाच, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीच्या टेंडर प्रक्रियेत हजारो कोटींचा गैरव्यवहार आणि ‘कमिशन फिक्स’ झाल्याचा लाचखोर कक्ष अधिकारी विलास लाड याने केला आहे.

    लाड याची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या क्लिपला दुजोरा देण्यात आला आला नाही. मंत्रालयात अर्थ विभागात कार्यरत लाड याला ६.३७ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्याच्याकडून प्राप्त झालेल्या कथित संभाषणात नाशिक कुंभमेळ्यासाठी विविध कामांची टेंडर प्रक्रिया ‘मॅनेज’ करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. ७०० तंबू उभारणी, ई-टॉयलेट्स, स्वच्छता व्यवस्था तसेच भोजन व्यवस्थेची कोट्यवधींची टेंडर मिळाल्याचेही क्लिपमध्ये तो सांगतो.

    Maharashtra TimesAshok Kharat प्रकरणाचा तपास करणारी SIT ची पहिली पत्रकार परिषद, अशोक खरातचे A टू Z कूकृत्य सांगितले
    ४० दिवसांच्या कुंभमेळ्यात प्रत्यक्ष खर्च कमी असूनही मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळणार असल्याचा दावा या संभाषणात करण्यात आला आहे. सिंहस्थात १५ हजार कोटींची कामे आहेत. त्यात ७०० तंबू उभारणी, ई-टॉयलेट्स, स्वच्छता व्यवस्था तसेच भोजन व्यवस्थेची कोट्यवधींची टेंडर मिळाल्याचेही तो सांगतो. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    चौकशीची मागणी
    या प्रकरणामुळे नाशिक कुंभमेळ्याच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, व्हायरल ऑडिओतील दाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या अधिकृत तपासानंतरच आरोपांमागील सत्य स्पष्ट होणार असल्याचा दावा प्रशासकीय सूत्रांकडून करण्यात आला आहे.

    Maharashtra Timesपोहण्याची हौस बेतली चिमुकल्यांच्या जीवावर! वेगवेगळ्या घटनांत 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, नाशिक हळहळलं
    अधिकारी-मंत्र्याचाही सहभाग ?
    विशेष म्हणजे, या व्यवहारांमध्ये छोट्या अधिकाऱ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांची टक्केवारी निश्चित झाल्याचेही तो सांगताना क्लिपमध्ये ऐकू येते. या क्लिपमध्ये १०२१ प्रकारच्या कामांचे टेंडर आधीच ठरवून देण्यात आल्याचे सांगितले जाते. यामधून स्वतःला सुमारे ५०० कोटी रुपयांचा हिस्सा मिळणार असल्याचा दावा लाड करताना दिसतो. संबंधित व्यक्तीला ‘तुमच्या ओळखीचे लोक असतील तर त्यांनाही टेंडर मिळवून देऊ,’ असेही आश्वासन दिल्याचेही क्लिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा