Nashik Women Assault Case : चौदा वर्षांपूर्वी अशोक खरातसोबत कामानिमित्त ओळख झाल्यानंतर देवदर्शनासाठी बुकिंग करण्याच्या बहाण्याने त्याने परब व त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो घेतले आणि बनावट बँक खाते उघडले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : पूजाविधीसाठी परदेश दौऱ्याचे स्वप्न दर्शवून पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाला लुटणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’ याने देवदर्शनाच्या दाव्यातून मुंबईतल्या हॉटेल व्यावसायिकाच्या नावे पतसंस्थेत बनावट खाते उघडून कोट्यवधींचे गैरव्यवहार केले आहेत. खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासणीवेळी पतसंस्थेतील काही खातेधारकांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर हे बिंग फुटले आहे. अहिल्यानगरच्या राहाता पोलिसांत खरातसह समता पतसंस्थेच्या तत्कालीन मॅनेजरविरुद्ध गुन्हा नोंद असून, संबंधित पतसंस्थेतील सर्व खातेधारकांची पडताळणी पोलिसांनी सुरू केली आहे.
काय आहे प्रकरण?
लैंगिक अत्याचार व भोंदूगिरी करणाऱ्या संशयित खरातविरुद्ध नाशिक शहर पोलिसांच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात अकरा गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ गुन्हे अत्याचाराचे असून, एक खंडणी व दोन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यासह शिर्डी पोलिसांत खरातविरुद्ध खासगी सावकारी आणि राहाता पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. खरातविरुद्धच्या गुन्ह्यांची संख्या तेरापर्यंत पोहोचली असून, शिर्डी पोलिसांत दाखल सावकारीच्या गुन्ह्यात परब यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यावेळी परब यांच्या नावे बनावट बँक खाते उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. Nagpur Crime : मला रडायला येत नाही! 50 लाखांची खंडणी, शाळकरी मुलाला शेजाऱ्यानेच अपहरण करुन संपवलं, अटकेनंतर पश्चातापही नाही
देवदर्शनाच्या बहाण्याने ठकबाजी
दरम्यान, दिनेश परब यांनी राहाता पोलिसांत फिर्याद दिली असून, ते मुंबईतील हॉटेल व्यावसायिक आहेत. कामानिमित्त चौदा वर्षांपूर्वी त्यांची अशोक खरातसोबत ओळख झाली. खरातने देवदर्शनासाठी बुकिंग करण्याच्या बहाण्याने परब व त्यांच्या पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि फोटो घेतले. त्याद्वारे ही ठकबाजी झाल्याचे समोर येत आहे.
Ashok Kharat Case | भोंदू खरातवर मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल, काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश निश्चित
Dosa Batter Death : डोशाच्या पिठामुळे चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई-वडील गंभीर, कुटुंबाचा दावा; दुकानदाराच्या उत्तराने मोठा ट्विस्ट
…आता शिर्डी केंद्र
संशयित खरातविरुद्ध नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत गुन्हे नोंद झाल्यानंतर मार्च अखेरपासून शिर्डी पोलिसांत गुन्हे नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. राहाता पोलिस ठाण्यात नव्याने दाखल गुन्ह्याचा तपासही शिर्डी पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. त्यातच ‘एसआयटी’ने नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत मुक्काम ठोकत तपासणी सत्र राबवले आहे. मात्र, संशयितांची धरपकड आणि खरातविरुद्धच्या आर्थिक व्यवहारांचा तपास मात्र आता शिर्डी पोलिसांच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच नाशिकमध्ये ‘एसआयटी’ने अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नसले, तरी शिर्डी पोलिसांनी सावकारीच्या गुन्ह्यांत इतर संशयितांना अटक केली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा