• Tue. Sep 8th, 2026

अजित पवारांचा घातपात असेल तर…; DGCA, ब्लॅक बॉक्सबाबत अमोल मिटकरींचा संताप

अजित पवारांचा घातपात असेल तर…; DGCA, ब्लॅक बॉक्सबाबत अमोल मिटकरींचा संताप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र अद्याप सावरलेला नाही. अजित पवारांची राष्ट्रवादीही हे दुःख पचवत नव्याने उभारी घेतेय. त्यातच बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागल्याने सुनेत्रा पवारांसमोर आव्हान निर्माण झालंय. सोमवारी सुनेत्रा पवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीचे सगळेच बडे नेते बारामतीत आलेले. यावेळी अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा अपघात झाला त्या ठिकाणी जाऊन अभिवादन केलं. विशेष म्हणजे यावेळी मिटकरींनी त्यांच्या लाडक्या दादांसाठी लिहिलेलं एक भावनिक पत्रही अर्पण केलं. बारामतीत अजितदादा नाहीत म्हणजे पंढरीत विठ्ठल नाही, अशा आशयाचं मिटकरींचं हे पत्र सर्वांनाच भाविक करणारं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed