भाजपने 2029 च्या निवडणुकांसाठी रणनीती आखल्याचं आता स्पष्ट होत आहे. पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरुन याबाबत संकेत मिळत आहेत. रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्नेहल निमगिरे, पुणे : आगामी 2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात सध्या मोठ्या घडामोडी सुरु आहेत. भाजपकडून मोर्चबांधणी केली जात आहे. पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज पुण्यातील भाषणात केलेल्या वक्तव्यावरुन याची प्रचिती येताना दिसत आहे. रवींद्र चव्हाण यांनी सर्व भाजप कार्यकर्त्यांन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यात भाजपच्या ४४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘सक्रिय कार्यकर्ता संमेलनात’ पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संघटन बळकट करण्याचा आणि नव्या पद्धतीने काम करण्याचा स्पष्ट संदेश दिला. बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या या मेळाव्यात राज्यभरातील कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती. या संमेलनाच्या माध्यमातून पक्षाची पुढील दिशा, रणनीती आणि संघटनात्मक ताकद अधिक वाढवण्यावर भर देण्यात आला.
यावेळी बोलताना चव्हाण यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीचा उल्लेख केला. “आज आपल्या पक्षाकडे दीड कोटी सदस्य असून अडीच लाखांहून अधिक सक्रिय कार्यकर्ते आहेत. ही मोठी ताकद आहे. मात्र, बदलत्या काळानुसार आपल्यालाही कामाची पद्धत बदलावी लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल युगात सोशल मीडियाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी कार्यकर्त्यांना फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या प्लॅटफॉर्मवर सक्रिय होण्याचे आवाहन केले.
“आजच्या राजकारणात नॅरेटिव्ह खूप महत्त्वाचा ठरतो. जो कोणी चुकीचा किंवा दिशाभूल करणारा नॅरेटिव्ह तयार करतो, त्याला तिथेच ठामपणे उत्तर देणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर सक्रिय राहिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम जनतेपर्यंत पोहोचतो,” असेही त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी केवळ मैदानातच नव्हे तर डिजिटल स्तरावरही पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, असा संदेश त्यांनी दिला.
रवींद्र चव्हाण 2029 च्या लक्ष्याबद्दल काय म्हणाले?
या संमेलनात त्यांनी आगामी २०२९ च्या राजकीय लक्ष्यावरही भाष्य केले. “आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत. त्यातील काही आव्हाने उघडपणे सांगता येत नाहीत, पण बूथ स्तरावरचे कार्यकर्ते ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. जर सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला, तर २०२९ पर्यंत आपण अपेक्षित असलेली मजबूत भाजपा उभी करू शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरवर्षी ६ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात अशा प्रकारच्या संमेलनांचे आयोजन केले जात आहे. मुंबईनंतर पुण्यात हा कार्यक्रम पार पडला असून येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्येही अशाच बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांद्वारे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून पक्षाची विचारधारा आणि भविष्यातील योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा