अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. यावेळी तपास पथकाच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी तपासाबद्दल सविस्तर माहिती दिली. आतापर्यत काय-काय कारवाई करण्यात आली आहे, याविषयी त्यांनी माहिती दिली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने आज पहिली पत्रकार परिषद घेतली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी तपासात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली? याबाबत सविस्तर माहिती दिली. अशोक खरात प्रकरणात 17 मार्चला पहिला गुन्हा दाखल झाला. तर 20 मार्चला एसआयटीकडे तपास आला, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली. “20 मार्च 2026 या पासूनचा गुन्हा आणि त्याशिवायचे 11 गुन्हे एसआयटीकडे तपासासाठी आहे. सदर विशेष तपास पथकामध्ये दोन पोलीस अपअधीक्षक आहेत. सहाय्यक तपास अधिकारी म्हणून 3 पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 10 पोलीस उपनिरीक्षक आणि 6 पोलीस अंमलदार अशा एकूण 24 जणांचं तपास पथक आहे”, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.
“अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये अशोक खरात आरोपी आहे. या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. 2 गुन्ह्यांचा पोलीस अहिल्यानगर पोलीस करत आहेत. एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. अशोक खरात विरुद्ध नसलेले पण या विषयाशी संबंधित असलेल्या दोन गुन्ह्यांच्यादेखील तपास एसआयटी करत आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
“आमच्याकडे दाखल असेल्लाय गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. उर्वरित 3 गुन्हे फसवणूक, अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकोनॉमिक ऑफेन्सेसचे कलम दाखल आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा एक गुन्हा तपासासाठी एसआयटीकडे आहे”, असं सातपुते यांनी सांगितलं.
अशोक खरात कशाप्रकारे महिलांना जाळ्यात अडकवायचा?
“आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा जास्त साक्षीदारांकडे आपण विचारपूस केली आहे. साक्षीदार आणि पीडितांकडे आपण जी विचारपूस केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीता दाखवत होता. खडे, चिंचोका, रुद्राक्ष, पूजा, विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. महिलांना स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता. त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून, त्यांना बदनाम करण्याची धमकी देवून त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याचबरोबर ईशानेश्वर मंदिर परिसरात अंधारामध्ये हातचालाखीने स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होता, असं तपासात निष्पन्न होत आहे”, अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली.
तेजस्वी सातपुते यांचं मोलाचं आवाहन
“महिला अत्याचाराच्या संदर्भात आठही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबिय अतिशय धाडसाने सामोरे आले आहेत. त्यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यामुळेच आपण आरोपीवर कारवाई करु शकत आहोत. मी सर्वांना आवाहन करु इच्छिते की, या महिलांना लोक काय म्हणतील या भीतीने अन्याय सहन केला आहे. आता कुटुंबाला विश्वासात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडीओ न बाळगणे हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत. पीडितेची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खासगी बाबींची सार्वजनीक चर्चा न होणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच न्याय संस्थेने वारंवार कारवाई केली आहे”, असं सातपुते म्हणाल्या.
“अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदेतही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाजमाध्यमातून झाला आहे तिथून ती माहिती हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पीडिता किंवा कुटुंबियांची मुलाखती घेण्यास बंदी आहे. अंतिम निकाल येण्यापूर्वी आरोपीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आणि मीडिया ट्रायल, केवळ तर्कवितर्काच्या आधारित वार्तांकन टाळावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत”, असं आवाहन त्यांनी केलं.
तपास किती दिवसांत पूर्ण करणार?
“एसआयटीचे या प्रकरणात 40 ते 45 दिवसांत तपास पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. पीडितांना मनस्ताप होणार नाही याची समाज म्हणून काळजी घेऊयात. आपल्या माध्यमातून पदाधिकारी, अधिकारी यांना चौकशीसाठी बोलवणार आहेत का? किंवा अमूकला का बोलावलं नाही? अशा प्रकारच्या शंका आणि प्रश्न असू शकतात. अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मला वेळोवेळी मेसेज करुन विचारलं आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
कुणाकुणाची चौकशी होणार?
“मी सांगू इच्छिते की, आपल्याकडे फिर्यादी आणि साक्षीदार सांगतात त्या अनुषंगाने तपास होत असतो. तपासा दरम्यान पुरावे समोर येत असतात त्यानुसार पुढील तपास केला जातो. पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सहआरोपी आहे का? ते पाहिलं जातं. त्या अनुषंगाने त्याची चौकशी केली जाते आणि कायदेशीर कारवाई केली जाते. या प्रकरणात इतर कोणी आरोपी आहे का? पुराव्यानिशी माहिती मिळाली तर निश्चित तपास केला जाईल. आमचा तपास अजूनही सुरु आहे. काही प्रश्नांचे उत्तरे राहिली असती तपास पुढे जाईल तशी माहिती दिली जाईल. आरोपी अशोक खरातची पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयात विनंती करणार आहोत. अशोक खरातचे आर्थिक व्यवहार आणि संपत्तीबाबत ईडीने माहिती घेतली आहे. भविष्यातही ईडीला आमचे पूर्ण सहकार्य असणार आहे”, अशी महत्त्वाची माहिती IPS तेजस्वी सातपुते यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा