• Tue. Sep 22nd, 2026

मराठी भाषा विभागासह सात संकेतस्थळांचे शासनाच्या डोमेनवर हस्तांतरण पूर्ण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 6, 2026
मराठी भाषा विभागासह सात संकेतस्थळांचे शासनाच्या डोमेनवर हस्तांतरण पूर्ण – महासंवाद

मुंबई, दि. ६ : मराठी भाषा विभाग तसेच विभागाच्या अधिनस्त कार्यालयांच्या सातही संकेतस्थळांचे महाराष्ट्र शासनाच्या मानक maharashtra.gov.in डोमेनवर यशस्वीपणे हस्तांतरण पूर्ण झाले असून सर्व संकेतस्थळे आता नव्या पत्त्यांवर नियमितपणे कार्यान्वित झाली आहेत.

मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, विश्वकोश प्रथमावृत्ती (१ ते २० खंड) तसेच मराठी परिभाषा कोश या संकेतस्थळांचे MahaIT मार्फत हस्तांतरण करण्यात आले. हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान आवश्यक तांत्रिक व प्रणालीगत बदल करण्यात आल्यामुळे संबंधित संकेतस्थळे काही काळ तात्पुरती अनुपलब्ध होती. मात्र, आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने सर्व संकेतस्थळे नव्या डोमेनवर सुरू करण्यात आली आहेत.

नवीन संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत :

मराठी भाषा विभाग – https://marathi.maharashtra.gov.in

भाषा संचालनालय – https://directorate-marathi.maharashtra.gov.in

राज्य मराठी विकास संस्था – https://rmvs-marathi.maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ – https://sahitya-marathi.maharashtra.gov.in

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ – https://marathivishwakosh.maharashtra.gov.in

विश्वकोश प्रथमावृत्ती (१ ते २० खंड) – https://vishwakosh-marathi.maharashtra.gov.in

मराठी परिभाषा कोश – https://shabdakosh-marathi.maharashtra.gov.in

सर्व नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यिक, साहित्यप्रेमी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यापुढे या नव्या संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed