Nanded Sonu Kalyankar Murder Case : नांदेडमधील श्रीनगर भागात सोमवारी पहाटे झालेल्या शिवसैनिक सोनू कल्याणकर या तरुणाच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नांदेड : शिवसेना कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणाला प्रेम संबंधाची किनार असल्याचं समोर आलं आहे. बहिणीची सोयरीक मोडल्याचा रागातून कारागृहात असलेल्या भावाने खुनाचा कट रचला. हत्येप्रकरणी मुलीचे वडील आणि भावासह सहा जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंधरा दिवसापूर्वीच त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.
काय आहे प्रकरण?
नांदेडमधील श्रीनगर भागात सोमवारी पहाटे झालेल्या सोनू कल्याणकर या तरुणाच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे. बहिणीची सोयरीक मोडल्याचा राग मनात धरुन कारागृहात असलेल्या भावाने कट रचत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तरुणाची हत्या केल्याची तक्रार पीडित कुटुंबानी केली आहे.
15 दिवसांपूर्वी धमकी
मयत तरुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी मुलीचा भाऊ, वडील याच्यासह चार जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी हल्लेखोरानी सोनू कल्याणकर यांना गाठून ‘तुझे दिवस भरले आहे, नीट रहा’ अशी धमकी दिली होती.
दहा वर्षांपूर्वी अफेअर
मयत सोनू कल्याणकर हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा कार्यकर्ता होता. कारागृहात असलेला आरोपी गोलू मंगनाळे याच्या बहिणी सोबत त्याचे दहा ते बारा वर्षापूर्वी प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. याच दरम्यान घरच्यांनी मुलीचे दुसरीकडे लग्न ठरवले. काही दिवसानंतर लग्न मोडले. सोनू कल्याणकर याच्यामुळे लग्न मोडल्याचा आरोप करत मुलीच्या कुटुंबियांनी २०२० मध्ये विमानतळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचेही आता फिर्यादींनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान २०२१ साली मुलीचा भाऊ गोलू मंगळनाळे याने आपल्या काही सहकाऱ्यांसोबत सोनू कल्याणकर याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने गोळीबार देखील केला होता, त्यात तो थोडक्यात बचावला. विशेष म्हणजे गोलू मंगनाळे हा कुख्यात दहशतवादी रिंदा गँगचा सदस्य असून सध्या तो कारागृहात आहे.
सोनूच्या वडिलांची तक्रार
बहिणीची सोयरीक मोडल्याचा रागातून गोलू मंगनाळे याने कट रचून सोनू कल्याणकर याचा खून केला. यात मुलीचे वडील चंद्रविजय मंगनाळे यांचा देखील सहभाग असल्याचे मयताचे वडील अशोक कल्यांणकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चंद्रविजय मंगळनाळे, मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे यांच्यासह जीवघेणा हल्ला करणारे रोहित लोट, पियुष शिंदे, अंकुश गंधनवाड, मधू जोगदंड आदी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेच्या काही तासातच पोलिसांनी चारही मारेकऱ्यांना ताब्यात घेतले. दरम्यान ७० तासात पाच जणांचा खून झाल्याने सर्वसामान्य नांदेडकरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा