Mumbai Metro Aqua Line: सुरक्षारक्षक म्हणजेच ‘मसुब’च्या जवानांचा ओढा पोलिस दलाकडे अधिक असतो. पोलिस भरती सुरू झाली की हे जवान तिकडे वळतात आणि त्यामुळे मनुष्यबळाची वारंवार कमतरता भासत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मुंबईतील ॲक्वा मेट्रोतही प्रेमी युगुलांचे चाळे; सुरक्षा कंत्राटी पद्धतीवर असल्याचे धक्कादायक वास्तव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दिपेश मोरे, मुंबई : मुंबईतील पहिल्याच भूमिगत आणि तितक्याच संवेदनशील मेट्रो-३ म्हणजेच ॲक्वा मेट्रोची सुरक्षा कंत्राटी पद्धतीवर असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. पोलिसांप्रमाणेच काम, तितकीच जोखीम आणि जबाबदारी असतानाही कंत्राटी पद्धतीवर राबवून घेतले जात असल्याने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (मसुब) जवानांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच कर्तव्यवाटपातील विषमता, बदल्या आणि कंत्राटी नियुक्ती यांमुळे गैरहजेरीचे प्रमाण अधिक असून त्याचा ताण इतरांवर पडतो. मेट्रो-३मध्ये तर अधिकाऱ्यांनाही जवानांचे काम करावे लागते. अशा अनागोंदीमुळे अनेकांची या ठिकाणी कर्तव्य बजावण्याची मानसिकताच नसल्याचे चित्र ‘मसुब’मध्ये दिसते.
मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारावर कोणतीच सुरक्षा नसतानाच, तपासणी केंद्रांवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे जवानही कंत्राटी आहेत. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संवेदनशील ठिकाणे, आस्थापना यांच्या सुरक्षेचा भार पोलिसांवर पडत असल्याने, राम प्रधान समितीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या धर्तीवर महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना करण्याची शिफारस केली. मात्र तसे न करता सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन करून त्याअंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची निर्मिती केली. सुमारे दहा हजार जवान यामध्ये कार्यरत असून स्थापनेपासून हे सर्व कंत्राटावर काम करीत आहेत.
‘मसुब’मध्ये सुरक्षा अधिकारी, साहाय्यक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, मुख्य सुरक्षारक्षक आणि सुरक्षारक्षक असा पदक्रम आहे. इतर आस्थापनांमध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी हा तेथील प्रभारी अधिकारी आहे. मात्र मेट्रो-३मध्ये या अधिकाऱ्याला प्रसंगी सुरक्षारक्षकाचे काम करावे लागते. अनेक मेट्रो स्थानकांवर सुरक्षारक्षक ते थेट साहाय्यक सुरक्षा अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे. सुरक्षा पर्यवेक्षक, मुख्य सुरक्षारक्षक या पदावर कोणीही नसल्याने त्यांची कामेदेखील अधिकाऱ्यांनाच करावी लागतात. चारपैकी एका सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्याला २७ पैकी एका स्थानकावर कधीही कर्तव्य बजावण्यास धाडले जाते. एक दिवस गैरहजर राहिल्यास वरिष्ठ अधिकारी ज्या स्थानकावर असतील त्या ठिकाणी जाऊन हजर व्हावे लागते. कर्तव्यवाटपात ही विषमता असल्याने अनेक अधिकारी बदलीच्या मानसिकतेत आहेत, मात्र बदल्यांमध्येही आर्थिक गणित असल्याचा त्यांचा आरोप आहे.
बेवारस वस्तू, अश्लील चाळे
एका स्थानकावर अधिकारी आणि जवान मिळून ४० ते ४५ जण नेमणुकीला असतात. तीन पाळ्यांमध्ये ही संख्या अपुरी असल्याने तपासणी केंद्र सोडून स्थानकाच्या इतर ठिकाणी कायम बंदोबस्त ठेवता येत नाही, केवळ अधूनमधून गस्त घातली जाते. प्रवेशद्वारापासून ते तपासणी केंद्रापर्यंतच्या निर्मनुष्य आणि शुकशुकाट असलेल्या भागात कुणीही काहीही वस्तू ठेवून जातात. दिल्ली मेट्रोप्रमाणे या ठिकाणीदेखील प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे सुरू असतात.
आरोग्याच्या तक्रारींत वाढ ‘मसुब’च्या जवानांना आठ तास ड्युटी करावी लागते. मात्र मेट्रो भूमिगत असल्याने आतमध्ये सूर्यप्रकाश नाही, वातावरण कोंदट असते. एसीशिवाय आत बसणे अशक्य असते आणि इतके तास एसीदेखील अनेकांना सहन होत नाही. त्यामुळे मेट्रो-३ येथे नेमणुकीला असलेले ‘मसुब’चे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे येथील अधिकारी सांगतात.
(उत्तरार्ध)
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा