Amravati News: अपघातानंतर कारमधील जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून एका जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
अमरावती : अमरावती-अकोला महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला असून या अपघातात बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बेलोरा विमानतळ परिसरात घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्व युवक उशिरा अंदाजे रात्री 11 वाजता बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा घेऊन परत जात असताना त्यांच्या चारचाकी वाहनाला भरधाव वेगातील ट्रकने जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे.
कारमध्ये 7 जण; 4 ठार, 3 गंभीर जखमी
अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण सात जण होते. भरधाव ट्रकची धडक इतकी भीषण होती की कारमधील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तात्काळ रीम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
ट्रक चालक फरार; सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.
अपघातातील मृतांची नावे : मोहम्मद अनस मोहम्मद सईद (20) मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (22) मोहम्मद अवेज मोहम्मद सईद (26) अब्दुल अन्वेस अब्दुल सलीम (22)
दरम्यान, अपघातग्रस्त कारमधील हे सर्व युवक बडनेरा येथील जुनी बस्ती परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आलं असून या दुर्दैवी घटनेमुळे बडनेरा जुनी बस्तीमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे. कुटुंबातील तरुण मुलं मृत्युमुखी पडल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा