• Sat. Aug 1st, 2026

    मुंबईकडे परतताना फेरीत तांत्रिक बिघाड, ‘विजयदुर्ग रो-रो’ तात्पुरती बंद; जहाजाचे तीन इंजिन निकामी

    मुंबईकडे परतताना फेरीत तांत्रिक बिघाड, ‘विजयदुर्ग रो-रो’ तात्पुरती बंद; जहाजाचे तीन इंजिन निकामी

    Mumbai-Konkan Ferry: मुंबई-विजयदुर्ग रो-रो फेरी सुरू होऊन केवळ एक महिना झाला असतानाच सेवेला पूर्णविराम लावण्याची वेळ आली आहे. सहाव्या फेरीदरम्यान जहाजामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तीन इंजिन निकामी झाले आहेत. त्यामुळे इंजिन दुरस्त होईपर्यंत सेवा तात्पुर्ती बंद राहील.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईच्या भाऊचा धक्का येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गदरम्यानची रो-रो प्रवासी सेवा सुरू होऊन महिना उलटल्यावर लागलीच तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची वेळ आली आहे. समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनात बिघाड झाल्याने प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला.

    सहाव्या फेरीदरम्यान तांत्रिक बिघाड

    १ मार्चपासून ‘एमटूएम फेरीज प्रा. लि. कंपनी’कडून ‘एम२एम प्रिन्सेस’ या जहाजाद्वारे मुंबई-विजयदुर्ग सेवा सुरू करण्यात आली. या सेवेमुळे मुंबईहून विजयदुर्गदरम्यानचे अंतर अवघ्या सहा ते सात तासांत पार करणे शक्य झाले होते. प्रवाशांचाही याला उदंड प्रतिसाद लाभला. महिनाभरात सेवेच्या एकूण सहा फेऱ्या पूर्ण झाल्या, मात्र सहाव्या फेरीदरम्यान विजयदुर्गहून मुंबईकडे परत येताना समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड निर्माण झाला.Maharashtra TimesMumbai Metro: ठाणे, हार्बर लाइनवर पहिल्यांदाच मेट्रो धावणार! ‘मेट्रो 9 आणि 2बी’चं लोकार्पण; थेट अंधेरी ते मिरा-भाईंदर प्रवास

    जहाजातील चार इंजिनांपैकी सध्या केवळ एकच इंजिन कार्यरत असून उर्वरित तीन इंजिनांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग परदेशातून मागविण्यात आले आहेत. मात्र, पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीमुळे या भागांच्या पुरवठ्यात विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. अंदाजे १५ दिवसांत हे सुटे भाग उपलब्ध होतील. त्यानंतर दुरुस्तीसाठी आणखी १० दिवस लागण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र सागरी मंडळाने स्पष्ट केले. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांकडून ‘एम२एम प्रिन्सेस’ची तपासणी केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये, यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून दुरुस्तीचे काम सुरू आहे, असे मंडळाने स्पष्ट केले.

    Maharashtra TimesMumbai Local: आता 15 डब्यांची लोकल डहाणूपर्यंत! विरार-डहाणू चौपदरीकरणाला वेग; महिनाअखेर सेवा सुरू

    महिन्याभरात सेवा बंद

    मुंबईतून कोकणापर्यंत सहजपणे आणि जलद प्रवासासाठी ही रो-रो सेवा सुरू करण्यात आली होती. या फेरीमुळे मुंबई ते विजयदुर्ग प्रवासाचा वेळ कमी झाला. शिमग्याला कोकणात जाणाऱ्या नागरिकांना फायदा होईल या कारणाने 1 मार्च रोजी ही सेवा सुरू करण्यात आली खरी पण महागड्या दरांमुळे कोकणवासियांनी फेरीकडे पाठ फिरवली होती. या बोटीची प्रवासी क्षमता 626 असली तरी तिकीट दरांमुळे महिन्याभरात प्रवासी संख्या खूप कमी नोंदवली गेली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा