• Sun. Jun 7th, 2026
    Buldhana Food Poisoning: बुलढाण्यात विषबाधेमुळे तीन भावंडांचा एकाच दिवशी मृत्यू; आईसह एका चिमुकलीवर उपचार सुरु, काय घडलं?

    Buldhana Food Poisoning: बुलढाण्यातील धाड येथे अन्नातून विषबाधा झाल्याने तीन सख्ख्या बहिण- भावांचा मृत्यू झाल्याची घटना आहे. तर आईसह एका चिमुकलीवर उपचार सुरु आहेत.

    विषबाधेने तीन बहीण-भावंडांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा: धाड येथील एकाच कुटुंबात आईसह तीन मुली व एक मुलगा अशा पाच जणांना विषबाधा झाली. यातील तीन लहानग्या बहीण-भावांचा मृत्यू झाला तर आईसह एका चिमुकलीवर बुलढाणा येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी घडलेल्या या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे.

    मोहम्मद अली मोहम्मद वसीम जमदार (वय ४), मशिरा मोहम्मद वसीम जमदार (वय ७) व फातिमा मोहम्मद वसीम जमदार (वय ८) या तीन बहीण-भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आई अफरीन मोहम्मद वसीम जमदार (वय ३४) व अश्मिरा वसीम जमदार (वय ३) या दोघींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोहम्मद वसीम जमदार यांची पत्नी, तीन मुली व एक मुलगा अशा पाच जणांना रविवारपासून पोटदुखी, मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू होता.

    Maharashtra TimesBuldhana News: रात्री झोपेत साक्षीला सर्पदंश, सकाळी आई-वडिलांची रुग्णालयाकडे धाव; पण वाटेतच लेकीचा करूण अंत
    सोमवारच्या सकाळी त्रास वाढत गेल्याने सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान अली व मशिरा यांचा मृत्यू झाला. आई व दोन मुलींना बुलढाणा येथे हलविण्यात आले. आई अफरीन यांच्यावर खासगी रुग्णालयात तर मुलगी फातिमा व अश्मिरावर बालरोगतज्ज्ञांकडे उपचार सुरू होते. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास उपचार सुरू असताना फातिमा हिची प्राणज्योत मालवली. अश्मिराची प्रकृती बरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
    Maharashtra TimesSonu Kalyankar : एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्याला भल्या पहाटे संपवलं, आरोपीचा पोलिसांवर गोळीबार, अखेर सिनेस्टाईल नांग्या ठेचल्या
    सकाळी मृत्युमुखी पडलेल्या अली व मशिरा या दोघांचे दुपारी शवविच्छेदन करण्यात आले. दुपारीच त्यांचे पार्थिव घरी नेण्यात आले. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    तर दुसऱ्या एका घटनेत, फुटाळा तलावात ३५वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. मृताची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा