Pune Couple abducted : पुण्यातील इमारतीच्या पार्किंगमधून २३ वर्षीय तरुणी आणि तिच्या २८ वर्षीय पतीचे वडिलांनी अपहरण केले. त्यांना मदत करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलसह तिघांना अटक करण्यात आली होती
भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणीचे वडील, कुटुंबातील आणखी एक सदस्य आणि त्या कॉन्स्टेबलविरुद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले.
सोशल मीडियातून प्रेम, पळून लग्न
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आणि उत्तर प्रदेशातील बस्ती येथील मूळ रहिवासी असलेला तरुण यांची काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली होती; त्यातून ते प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पदवीधर असलेल्या त्या तरुणीने आपल्या पालकांना न सांगता पुण्यात येऊन सुमारे १० दिवसांपूर्वी त्या तरुणाशी विवाह केला होता. तो तरुण व्यवसायाने सुतार आहे.
Dhrumil Patel : अल्पवयीन मुलाची स्टंटबाजी, मुंबईकर दाम्पत्याला उडवलं, पतीचा मृत्यू; हायकोर्टाचं गंभीर निरीक्षण, पालकांनाही खडे बोल
आंतरधर्मीय विवाहाला विरोध
तरुणीचे वडील नोकरीच्या शोधात अनेक वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील बलरामपूरहून चेन्नईला स्थायिक झाले होते, त्यांनी मुलगी पुण्याला निघून गेल्यावर चेन्नई पोलिसांकडे ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. “मुस्लिम कुटुंबातील वडिलांना आपली मुलगी एका हिंदू तरुणाशी लग्न करते, हे मान्य नव्हतं” असं पोलिसांनी सांगितलं.
तरुणीच्या हालचालींचा मागोवा घेत तिचे वडील चेन्नईहून त्या कॉन्स्टेबलसोबत पुण्यात आले. “त्या तिघांनी सोमवारी त्या तरुणीला आणि तिच्या पतीला बिल्डिंगखाली बोलावले. त्यानंतर त्यांनी दोघांनं पकडले, त्यांचे हात-पाय दोरीने बांधले, त्यांना एका कारमध्ये कोंबून वेगाने निघून गेले” असे पोलीस म्हणाले.
घरमालकाचा पोलिसांना फोन
त्या जोडप्यासोबत राहणाऱ्या रुममेटने ही घटना पाहिली आणि घरमालकाला याची माहिती दिली; घरमालकाने पोलिसांना फोन केला. “आंबेगाव पठार येथील रहिवासी असलेल्या घरमालकाच्या तक्रारीवरून आम्ही एफआयआर दाखल केला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला” असे पोलीस म्हणाले.
Prasad Vethekar : बापट, तुला खायची वाटतं चापट, माझा स्वभाव लई तापट; पुणेकर तरुणाचं रॅप साँग, डीजेविरोधातील भूमिकेला उत्तर
लॉजवर मारहाण
पोलिसांच्या माहितीनुसार, तिघे त्या जोडप्याला म्हाळुंगे येथील एका लॉजवर घेऊन गेले. तिथे त्या तरुणाला मारहाण करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक लॉजवर पोहोचेपर्यंत, चेन्नईहून आलेले ते तिघे त्या जोडप्याला कारमध्ये घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघून गेले होते. पोलिसांनी काही किलोमीटर पाठलाग केल्यानंतर खेड-शिवपूरजवळ ती कार अडवली. पोलिसांनी वाहन जप्त केले आणि त्यातील सर्वांना पोलीस ठाण्यात आणले.
“चौकशीदरम्यान, त्या महिलेने घटनाक्रम सांगितला आणि तिला तिच्या पतीसोबत राहायचे असल्याचे पोलिसांना सांगितले. आपण कायदेशीररित्या विवाहबद्ध झालो आहोत आणि लग्नासाठी आवश्यक असलेले कायदेशीर वय आपण पूर्ण केले आहे, असे त्या महिलेने आणि तिच्या पतीने आम्हाला सांगितले” असे पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले.
Bhagysharee Patwardhan Controversy : राजाची गादी हिंदू पुरुषालाच मिळते, विजयसिंहराजे पटवर्धनांनी लेक भाग्यश्रीला सांगली गणपती पंचायतनचा कायदाच सांगितला, तरतुदी काय?“आम्ही चेन्नई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे; कारण बेपत्ता महिलेबाबत आम्हाला माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्याऐवजी तो थेट त्या जोडप्याच्या घरी गेला होता. जेव्हा त्या महिलेचे वडील आणि नातेवाईक त्या जोडप्याला मारहाण करत होते, तेव्हा त्याने त्यांना रोखले नाही. इतकेच नाही तर, ज्या वाहनातून त्या महिलेचे आणि तिच्या पतीचे अपहरण करण्यात आले, त्या वाहनातून तो स्वतःही प्रवास करत होता,” असे पोलीस म्हणाले.
