• Sun. Jun 14th, 2026

    Nashik Accident: अमेरिकेत हॉटेल मॅनेजमेंट, गोव्यात जॉब, नाशिकमध्ये घरी आलेल्या तरुणाचा कार अपघातात मृत्यू, दोन मित्र गंभीर

    Nashik Accident: अमेरिकेत हॉटेल मॅनेजमेंट, गोव्यात जॉब, नाशिकमध्ये घरी आलेल्या तरुणाचा कार अपघातात मृत्यू, दोन मित्र गंभीर

    Nashik Accident: नाशिक-गिरणारे रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

    भरधाव कार झाडावर आदळून तरुण ठार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: अमेरिकेतून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेत पुन्हा नाशिकमध्ये परतलेल्या उच्चशिक्षित तरुणाचा भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना नाशिक-गिरणारे रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलाजवळ घडली.

    कसा घडला अपघात?
    शंतनू जयंत बुऱ्हाडे (वय २४, रा. जेलरोड) असे मृत तरुणाचे नाव आहे. कारमधील त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले असून, शंतनू हा बुऱ्हाडे कुटुंबातील एकुलता मुलगा होता. त्याच्या कुटुंबीयांच्या आक्रोशामुळे जेलरोड परिसर सुन्न झाला होता. नाशिक तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणात अपघातासह अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास शंतनू मित्रांसमवेत कार (एमएच ४६, झेड ००६७)मधून पर्यटनासाठी गंगापूर धरण परिसरात गेला होता. रात्री साडेआठच्या सुमारास गिरणारे परिसरातून नाशिककडे परतत असताना गोदावरी नदी पुलाजवळ त्याचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यावरील झाडावर आदळली.

    Maharashtra TimesRavindra Erande : हस्तरेषा तज्ज्ञ असल्याची बतावणी, इगतपुरीच्या लॉजवर महिलांशी शरीरसंबंध, एरंडेचे 121 व्हिडिओ समोर
    डोक्याला गंभीर दुखापत
    या अपघातात कारचा चक्काचूर झाला होऊन शंतनूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. प्रत्यक्षदर्शी व पोलिसांनी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शंतनू याला तपासून मृत घोषित केले.
    Maharashtra TimesAshok Kharat Case: CDR कुणी लीक केला, याबाबत चौकशी करु! दमानिया यांच्या दाव्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
    शंतनू याचे वडील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये कार्यरत असून, त्याची बहीण पुण्यात वास्तव्यास आहे. चार महिन्यांपूर्वी अमेरिकेतून परतलेला शंतनू गोव्यातील हॉटेलात चांगल्या पगाराची नोकरी करीत होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच तो नाशिकमध्ये कुटुंबीयांसोबत राहण्यास आला होता. या अपघातप्रकरणी नाशिक तालुका पोलिस पुढील तपास करीत आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा