Nagpur Boy Kidnap and Murder : चिमुरड्याचे अपहरण करून भाजीपाल्याचे थोक विक्रेते असलेल्या त्याच्या वडिलांकडून ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोपींचा डाव होता.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : हनुमान जयंती शोभायात्रेतून अपहरण करून अवघ्या १४ वर्षांच्या शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली. सोमवारी गुन्हे शाखेने या घटनेचा उलगडा केला. जयराम गोपाल यादव (१९, रा. आयबीएमरोड), केतन उर्फ कुणाल रमेश साहू (२२, रा. कुतुबशाह मशिदीजवळ, गिट्टीखदान) आणि आयुष मोहन साहू (१९, रा. शिवशंकर मंदिरासमोर, मानकापूर) अशी मारेकऱ्यांची नावे आहे. अश्विन (नाव बदलले आहे) याचा शेजारी जय हाच या हत्येचा सूत्रधार आहे. अश्विन जयला दादा म्हणायचा, त्याच्यावर विश्वास असल्यानेच तो जयसोबत गेला. त्यामुळे पेशवाईच्या इतिहासातील ‘काका मला वाचवा’ची पुनरावृत्ती येथे झाल्याचे दिसून येते.
काय आहे प्रकरण?
अश्विनचे वडील दिलीप हे भाजीपाल्याचे थोक विक्रेते आहेत. तिन्ही आरोपीसुद्धा भाजी पाल्याचा व्यवसाय करतात. अश्विनच्या वडिलांकडून हे तिघेही अनेकदा भाजीपाला खरेदी करत. यातील आयुष हा पार्सल पोहोचविणाऱ्या कंपनीतही काम करतो. त्यासाठी त्याने महिंद्राची एक चार चाकी गाडीही घेतली होती. हीच गाडी आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरल्याचे समोर आले आहे. अश्विनचे अपहरण करून भाजीपाल्याचे थोक विक्रेते दिलीप यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोपींचा डाव होता.
त्या दिवशी काय घडलं?
२ एप्रिल रोजी अश्विनच्या राहत्या घरासमोरून हनुमान जयंतीची शोभायात्रा जात होती. अश्विन या शोभायात्रेत होता. तेव्हा या परिसरात आईस्क्रिमचे वाटप सुरू होते. आईस्क्रिम खाल्ल्यानंतर ‘चल आपण एक फेरफटका मारून येऊ व बाथरूमला जाऊ’ असे सांगून जय अश्विनला घेऊन गेला. आयुष आणि कुणाल आधीच वाट पाहत होते. त्या तिघांनी अश्विनला आयुषच्या गाडीत बसविले व तेथून निघाले. Crime News : दहावीच्या विद्यार्थ्यावर अत्याचार, महाडमध्ये खाजगी क्लासच्या शिक्षकावर गुन्हा, पीडित मुलगा मानसिक तणावात
उंदीर मारण्याच्या औषधाचा वापर
जय हा अश्विनचा शेजारी होता, अश्विन त्याला दादा म्हणत असे. त्यांची चांगली ओळख होती म्हणूनच तो जयसोबत गेला. काही अंतर दूर गेल्यानंतर अश्विनने दादा आपण इतक्या दूर कसे काय आलो? असा प्रश्न केला. यावर जयने त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. या बोळ्याला उंदीर मारण्याचे औषध लावले होते. यामुळे अश्विन बेशुद्ध होईल असा आरोपींचा अंदाज चुकीचा ठरला. अश्विन आरडाओरडा करू लागला. अखेर या गोंधळात आरोपींनी कापडाच्या साहाय्याने अश्विनचा गळा आवळून खून केला. पुढे आरोपींनी अश्विनची बॉडी एका पोत्यात टाकली व कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरतवाडा परिसरातील रिंगरोडलगत फेकून दिली.
एकट्या सुनेत्रा पवार नाही, संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला! बारामतीकरांचा कौल काय?
‘मुझे रोना नही आता’
सीसीटीव्ही फुटेजच्या तपासादरम्यान अश्विन अखेरचा जयसोबतच आईस्क्रीम पार्लरजवळ दिसल्याचे स्पष्ट झाले. गिट्टीखदान पोलिस व गुन्हे शाखेने जयची चौकशी केली. येथे जयच्या जबाबात तफावत आढळून आली. अखेर कसून चौकशी केल्यावर जयने गुन्ह्याची कबुली दिली. या चौकशी दरम्यान पोलिसांनी जयला चांगलाच पोलिसी हिसका दाखविल्याचे कळते. मात्र, त्याच्या डोळ्यात आसवाचे टिपूसही नव्हते. यावर ‘मुझे रोनाही नही आता,’ असे जयने एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला सांगितल्याचे कळते. Crime News : तू फक्त माझा आहेस, तिला घटस्फोट दे; बायकोच्या शाळेतील शिक्षिकेचा तगादा, गुरुजींचं टोकाचं पाऊल
जय आला तक्रार द्यायला
अश्विनच्या हत्येनंतर त्याचं शव आरोपींनी भरतवाडा परिसरात फेकून दिला. यानंतर तिघेही आपआपल्या घरी परतले. त्यानंतर अश्विनच्या पालकांसोबत जय स्वत: गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आला. त्यामुळे स्वत: हत्या केल्यानंतर साळसुदपणाचा आव आणून जय अश्विनच्या कुटुंबीयांसह पोलिस ठाण्यात तक्रार द्यायलाही आला होता, हे विशेष.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा