• Sat. Jun 6th, 2026

    Nashik Crime: व्यावसायिक स्वत:चं पाप लपवायला गेला अन् अडकला; हार्डडिस्कमध्ये १२१ व्हिडिओ सापडले, नाशिकमधील नवं कांड कसं उघड झालं?

    Nashik Crime: व्यावसायिक स्वत:चं पाप लपवायला गेला अन् अडकला; हार्डडिस्कमध्ये १२१ व्हिडिओ सापडले, नाशिकमधील नवं कांड कसं उघड झालं?

    Nashik News: एरंडे याने फिर्यादी महिलेच्या मुलाला नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवले. पीडितेशी वारंवार शरीरसंबंध ठेवले; तसेच त्याचे मोबाइलद्वारे चोरून रेकॉर्डिंग केले.

    व्यावसायिक स्वत:चं पाप लपवायला गेला अन् अडकला; हार्डडिस्कमध्ये १२१ व्हिडिओ सापडले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिकमध्ये एका ‘ऑफिस बॉय’ने मालकाच्या गैरकृत्यांद्वारे त्याला ब्लॅकमेल करून बारा लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. या व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चार खंडणीखोरांना अटक केली. मात्र, जप्त केलेल्या ‘डीव्हीडी’मध्ये या व्यावसायिकाचेच शंभर आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात व्यावसायिक रवींद्र एरंडे (६२) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. सातपूर पोलिसांनी संशयित एरंडे याला बलात्कारासह ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

    नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील अनेक बाबी दिवसेंदिवस उघड होत असताना, हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    विशेष म्हणजे, आक्षेपार्ह व्हिडिओवरून चौघांनी खंडणी उकळल्याचे सांगून स्वतःचे पाप लपविण्याचा प्रयत्न व्यावसायिक; तसेच पत्रकार एरंडे याने केला होता. मात्र, त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे त्याचे बिंग फुटले आहे. खरातप्रमाणेच आता नाशिकमध्ये ‘एरंडे फाइल्स’ उघड झाली असून, आणखी काही पीडिता एरंडेविरुद्ध पोलिसांत तक्रारीसाठी पुढे आल्या आहेत.

    शुक्रवारी रात्री उशिरा पीडित महिला सातपूर पोलिसांत पोहोचल्यावर एरंडेविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. त्याला शनिवारी दुपारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. अभियोक्ता तथा सहायक संचालक किरण बेंडभर यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी तपासातील मुद्दे न्यायालयासमोर मांडले. त्यानुसार न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

    दरम्यान, एरंडेकडील टॅब, हार्डडिस्कमध्ये अशा प्रकारचे १२१ अश्लील व्हिडिओ आढळून आले. त्याने व्हिडिओद्वारे पीडित महिलांना ‘ब्लॅकमेल’ केल्याचा संशय आहे. एरंडेच्या ‘ऑफिस बॉय’ने हार्डडिस्क व टॅब चोरून मित्राच्या मदतीने एरंडेला खंडणीसाठी ‘ब्लॅकमेल’ केले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा