• Sun. Jun 7th, 2026

    Panchvati Express: ट्रेनचा डबा मागेच राहिला! एक डबा वगळून पंचवटी एक्स्प्रेस रवाना; सीएसएमटी स्थानकावर तांत्रिक बिघाड

    Panchvati Express: ट्रेनचा डबा मागेच राहिला! एक डबा वगळून पंचवटी एक्स्प्रेस रवाना; सीएसएमटी स्थानकावर तांत्रिक बिघाड

    CSMT-Manmad Express: शनिवारी पंचवटी एक्सप्रेस तब्बल दोन तास उशीराने रवाना झाली. एका डब्याच्या चाकात तांत्रिक बिगाड झाल्यामुळे हा विलंब झाला. नंतर तो डबा वगळून गाडी रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा खास प्रतिनिधी, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून पंचवटी एक्स्प्रेस (गाडी क्र. १२१०९ ) एक डबा वगळून मनमाडच्या दिशेने रवाना करण्यात आली. एक्स्प्रेसच्या महिला सर्वसाधारण डब्यातील चाकात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला. या गोंधळामुळे सीएसएमटीहून सायंकाळी ६.१५ वाजता रवाना होणारी पंचवटी रात्री ८.११ वाजता रवाना करण्यात आली. गाडीला एक डबा कमी असल्याने दादर, कल्याणमधील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

    डबा ‘सिक’ घोषित केला

    सीएसएमटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस सीएसएमटीतील फलाट क्रमांक १०वरून सायंकाळी ६.१५ वाजता रवाना होते. गाडी सीएसएमटी फलाटावर दाखल होत असताना डी-१ क्रमांकांच्या डब्यांच्या चाकात तांत्रिक बिघाड दिसून आला. त्यामुळे गाडी तातडीने थांबवण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली. बिघाड गंभीर असल्याने हा डबा ‘सिक’ घोषित करून दुरुस्तीसाठी यार्डमध्ये नेण्यात आला. त्यानंतर एक डबा वगळून एक्स्प्रेस मनमाडसाठी रवाना करण्यात आली.Maharashtra TimesJogeshwari Terminus: जोगेश्वरी टर्मिनससाठी आणखी एक वर्ष, 4 प्लॅटफॉर्मसह मिळणार मेट्रो, रेल्वेची जोडणी; मुंबईकरांना चौथ्या टर्मिनसची प्रतीक्षा

    सलग सुट्ट्यांमुळे पंचवटीला नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. त्यामुळे डी-१ डब्यातील प्रवाशांची अन्य डब्यांत व्यवस्था करण्यात आली. प्रवास रद्द करायचा होता, त्यांच्यासाठी तिकीट परताव्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

    लोकल प्रवाशांची एक्स्प्रेसमध्ये गर्दी

    प्रभादेवी पुलाचे पॅनल हटवण्यासाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते दादरदरम्यान शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी पहाटे ६ पर्यंत ब्लॉक घोषित केला होता. ब्लॉकमुळे सीएसएमटी ते दादर धीम्या-जलद लोकल वाहतूक बंद ठेवण्यात आली. लोकलसह मेल-एक्स्प्रेस ही बाधित झाली. सीएसएमटीवरील काही एक्स्प्रेस दादरवरून सोडण्यात आल्या. त्यातच पंचवटी एक्स्प्रेस जवळपास दोन तास विलंबाने धावत होती. कल्याणपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकलऐवजी मेल-एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यास पसंती दिली.

    Maharashtra TimesMumbai Local: 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार, वांद्रे स्थानकावरूनही सुरू होणार; पश्चिम रेल्वेवर प्रवास सुखकर

    सोलापूर, नांदेडसाठी सेवांचा विस्तार

    देशातील लहान शहरांना जोडून तेथील प्रवाशांना अधिक सेवा देण्यासाठी विविध विमान कंपन्या प्रयत्नशील आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गोव्यामध्ये मुख्यालय असलेल्या ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने आपल्या नियोजित नेटवर्कचा विस्तार केल्याची घोषणा शुक्रवारी केली. यामध्ये आंध्र प्रदेशच्या राजामुंदरी, विजयवाडा, हुबळी या शहरांमधून विमानसेवा उपलब्ध होणार आहे, तसेच सोलापूर-हैदराबाद आणि गोवा-सोलापूर मार्गांवर अतिरिक्त सेवा उपलब्ध होणार आहे. येत्या काळात नांदेडहूनही ‘फ्लाय-९१’ची सेवा सुरू होईल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा