• Sun. Jun 14th, 2026

    Buldhana News: रात्री झोपेत साक्षीला सर्पदंश, सकाळी आई-वडिलांची रुग्णालयाकडे धाव; पण वाटेतच लेकीचा करूण अंत

    Buldhana News: रात्री झोपेत साक्षीला सर्पदंश, सकाळी आई-वडिलांची रुग्णालयाकडे धाव; पण वाटेतच लेकीचा करूण अंत

    Snakebite Death: दिवसेंदिवस सर्पदंशाच्या घटना वाढत चालल्या असून आता अशाच एचा घटनेमुळे एका 19 वर्षीय मुलीचा बळी गेला आहे. साक्षी बी फार्मसीची विद्यार्थीनी असून अत्यंत हुषार होती. परंतु, तिचे स्वप्ने पूर्ण होण्यापूर्वीच तिचा करूण अंत झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमोल सराफ, बुलढाणा: सध्या बहुतांश ठिकाणी जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे .आणि अशातच मुख्यतः ग्रामीण भागात अर्धवट ऊन दमट वातावरण सकाळी थंड वारा आणि हा सगळा प्रकार सुरू असताना मुख्यतः सापांना त्यांच्या बिळात अस्वस्थ करत असतो. ते वातावरण बदलामुळे अचानक त्याच्यातून बाहेर येत जिथे मिळेल तिथे आसरा घेत असता. आणि याचाच एक बळी ही युवती ठरली आहे.

    घरात झोपलेली असतानाच सर्पदंश

    बुलढाणा जिल्ह्यात सर्पदंशामुळे एका 19वर्षीय युवतीचा करूण अंत झाला आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथे ही घटना घडली आहे. ही युवती शुक्रवारी रात्री आपल्या घरात झोपली होती. त्यावेळी रात्री झोपेतच तिला विषारी सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याने या युवतीचा मृत्यू झाल्याची घटना चार एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली.Maharashtra TimesNanded News: आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला, श्रीदत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

    मृत युवती साक्षी ही रवींद्र शेषराव सानप यांची कन्या आहे. शुक्रवारी रात्री ती तिच्या आई-वडिलांशेजारी झोपलेली होती. त्याचवेळी एका विषारी सापाने तिचा चावा घेतला. पण तिला त्यावेळी काहीच त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच तिच्या घशात दुखू लागले. तिला काही कारणाने अस्वस्थ वाटू लागले. मुलीला ऍसिडिटी सदृश्य त्रास होत असल्यामुळे पहिलं तिच्या आई-वडिलांनी ऍसिडिटी झाली असावी असा निष्कर्ष लावला. पण त्रास वाढल्यामुळे तिला तात्काळ लोणार येथील दवाखान्यात घेऊन जाण्यात आले.

    उपचारांना प्रतिसाद नाही

    लोणार येथील दवाखान्यात उपचार सुरू केले. पण त्यावेळी तिने उपचाराला फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी तपास करताच डॉक्टरांना सर्पदंशाची लक्षणे दिसू लागली. त्यामुळे साक्षीला मेहकर येथील रुग्णालायत हलवण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणेच साक्षीचे आई-वडील तिला घेऊन रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाले. परंतु, रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हाच साप साक्षीच्या शेजारच्या अंगणात आढळून आल्यानंतर त्यांचा संशय खरा ठरला.

    Maharashtra TimesBuldhana Accident: दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, 23 प्रवाशांसह वाहन उलटलं; दोन युवकांचा जागीच मृत्यू

    कुमारी साक्षी ही केवळ 19 वर्षांची होती. ती सुलतानपूर येथील बी फार्मसी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती .तिच्या निधनाची बातमी समजताच गावावर शोक काळा पसरली वैद्यकीय तपासणीनंतर शोकाकुळ वातावरणात तिला अखेरचा निरोप देण्यात आला. तिच्या पश्चात आई-वडील बहिण ,भाऊ ,आजी आजोबा काका काकी असा बराच मोठा परिवार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा