Nashik Car Accident: इंदोरे गावावर शोककळा पसरली असून, अत्यंत शोकाकूल वातावरणात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिंडोरी अपघात: अपघातात कुटुंबच उद्ध्वस्त, पण वडिलांची बाईकमुळे दोन भावंडे थोडक्यात बचावली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक: विहिरीत कार कोसळून झालेल्या अपघातात इंदोरे (ता. दिंडोरी) येथील दरगोडे कुटुंबावर काळाने घाला घालत एकाच कुटुंबातील नऊ जणांना हिरावल्याने गावावर एकाचवेळी नऊ जणांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आली. या हृदयद्रावक घटनेने गावावर शोककळा पसरली असून, संपूर्ण गावच शोकमग्न झाल्याचे शनिवारी (दि. ४) दिसून आले.
खासगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून शुक्रवारी (दि. ३) रात्री इंदोरेकडे परताना दरगोडे कुटुंबाच्या मारुती सुझुकी एमपीव्ही कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून ती दिंडोरीतील शिवाजीनगर भागातील राजे बँक्वेट हॉल व मंगल कार्यालयाजवळील शेतातील विहिरीत जाऊन कोसळली. या भीषण दुर्घटनेत सहा विद्यार्थ्यांसह एकूण नऊ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कारमध्ये दरगोडे कुटुंबातील सहा विद्यार्थी व त्यांचे पालक होते. राजे बँक्वेट हॉलमध्येच हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
दरम्यान, शनिवारी (दि. ४) सकाळी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे, माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार मुकेश कांबळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच ग्रामीण रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाइकांची भेट घेत सांत्वन केले. शिवाजीनगर परिसरातील रस्त्यालगत असलेल्या या धोकादायक विहिरीसंदर्भात पर्यायी उपाययोजना का करण्यात आली नाही, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले. विहीरमालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित विहीर तातडीने बुजविण्यात येणार असून, जिल्ह्यात अशा धोकादायक विहिरींचा सर्वे करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणाही महाजन यांनी केली. तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. दरम्यान, दुपारी शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, दिंडोरी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
क्षणात सगळे संपले…
व्यवसायाने शेतकरी असलेल्या दरगोडे कुटुंबावर कोसळलेले दु:ख शब्दात न मांडता येणारे आहे. सुनील दत्तू दरगोडे त्यांची पत्नी रेश्मा आणि मोठी मुलगी गुणवंती यांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. मागे साडेतीन वर्षांचा निष्पाप चिमुकला असून, तो आई-वडिलांच्या मायेपासून कायमचा वंचित झाला. याच घटनेत त्यांच्या दोन पुतण्यांचाही अंत झाला. एकाच कुटुंबावर एवढे मोठे दुःख कोसळले. दुसरीकडे, अनिल मनोहर दरगोडे यांना स्वतःच्या डोळ्यांसमोर संसार उद्ध्वस्त होताना पाहावे लागले. त्यांची पत्नी आशा, मुलगी सृष्टी, मुलगा श्रेयस आणि पुतणी समृद्धी यांना त्यांनी स्वतः कारमध्ये बसवले आणि ते स्वतः मोटारसायकलने मागे निघाले. पण काही क्षणातच त्यांच्या डोळ्यांसमोर ती कार विहिरीत कोसळून होत्याचे नव्हते झाले.
भावंडे थोडक्यात बचावली
श्रुती सुनील उमरे व नरेंद्र सुनील उमरे या बहीण-भावाचे मात्र नशीब बलवत्तर ठरले. हे दोघे अपघातग्रस्त कुटुंबासोबत कारने प्रवास करीत होते. मात्र, परतीच्या वेळी त्यांनी वडिलांच्या दुचाकीवरून जाण्याचा निर्णय घेतला. याचदरम्यान अपघात झाला. त्यामुळे श्रुती व नरेंद्र उमरे या भावंडांचे प्राण वाचले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा