• Wed. Jun 17th, 2026
    Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला साक्षात मारुतीरायाचं दर्शन! अख्खी वानरसेना बसली पंगतीला, अकोल्यात 20 वर्षांची अनोखी परंपरा

    Hanuman Jayanti 2026: रामदास महाराज यांनी स्वतः या वानरांना पदार्थ वाढले. ही अनोखी पंगत अनुभवण्यासाठी परिसरातील भाविकांनी कोथळी बुद्रुकच्या मंदिरात गर्दी केली होती.

    हनुमान जयंतीला बसली वानरांची पंगत(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. वृत्तसेवा, अकोला: एरवी मंदिर परिसरात दर्शनासाठी जाताना हातात कुठलीही वस्तू दिसली तरी वानरे त्रास देतात. कोथळी बुद्रुकमधील हनुमान मंदिर परिसरही याला अपवाद नाही. पण, हनुमान जयंतीला हीच मानरे शिस्तीत दिसतात. त्यांच्यासाठी पंगत वाढली जाते. पंगतीत बसून हे सर्व जेवण करतात. मागील वीस वर्षांपासून ही परंपरा पाळली जात आहे. गुरुवारी दूरवरून भाविकांनी ही वानरांची पंगत अनुभवण्यासाठी गर्दी केली होती.

    अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यात कोथळी बुद्रुक हे गाव येते. या गावात हनुमानाचे मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात वानरांंची गर्दी तशी नेहमीची. मंदिरात येणाऱ्या भाविकांना काही प्रमाणात या वानरांचा त्रासही सहन करावा लागतो. हीच त्रासदायक वानरे हनुमान जयंतीच्या दिवशी अगदी शिस्तीत असतात. या वानरांसाठी पंगत आयोजित केली जाते.

    Maharashtra TimesPune Rain News : पुण्यात झाड कोसळून फुलविक्रेता महिला दगावली, प्रशासनाविरुद्ध नागरिक संतप्त
    मंदिराचे पुजारी रामदास महाराज दरवर्षी ही व्यवस्था करतात. गुरुवारी या पंगतीत बसलेल्या वानरांना स्टीलच्या ताटांमध्ये शेंगदाणे, चणे, वाटाणे, हरभरा आणि मिठाई वाढण्यात आली. यानंतर परिसरातील शंभराहून अधिक वानरे शिस्तीत येऊन ताटासमोर जाऊन बसली. त्यांनी ताटात वाढलेले सर्व पदार्थ खाल्ले. ताटात कुठलेही अन्न शिल्लक राहू नये याची काळजीही घेतली. काही वानरांनी आपल्या पिलांनाही सोबत आणले होते.

    Maharashtra TimesSatara Rain : साताऱ्यात पुन्हा वादळी पावसाचा धुमाकूळ, वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, महामार्गावर वाहनचालकांची कसरत
    तर दुसरीकडे, वाळूज महानगर परिसरातील विविध मंदिरांमध्ये गुरुवारी (दोन एप्रिल) हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. येथील बजाजनगर, पंढरपूर, रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, तुर्काबाद, घाणेगाव, वडगाव, जोगेश्वरी आदी ठिकाणच्या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाने हनुमान जयंती साजरी करण्यात आली. वाळूजमहानगर परिसरातील विविध मंदिरात हनुमान जयंती निमित्त भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह, रक्तदान शिबिर, अन्नदान आदी उपक्रम राबवून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा