Dahisar to Mira-Bhayander Metro: मिरा भाईंदरकरांना गेल्या अनेक वर्षांपासून मेट्रोचं स्वप्न दाखवलं जात आहे. अनेक विलंबांनंतर ही मेट्रो तयार झाली पण काही न काही कारणांमुळे उद्घाटन पुढे ढकलले जात आहे. अशात मिरा भाईंदरमधील प्रवाशांना दिलासा कधी मिळाणार असा प्रश्न निर्माण होतो.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: हजारो प्रवाशांच्या सुरक्षित, जलद आणि गारेगार प्रवासाची आशा पुन्हा राजकीय कार्यक्रमांच्या फेऱ्यात अडकली आहे. दहिसर–मिरा-भाईंदर मेट्रो नऊ, डीएननगर ते मानखुर्द मेट्रो दोन बी यांसह वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) पॉड टॅक्सी प्रकल्प आणि ठाणे-बोरिवली बोगद्याच्या टनेल बोरिंग मशिनच्या (टीबीएम) शुभारंभ असा मोठा कार्यक्रम ३ एप्रिलला अपेक्षित होता. मात्र, राजकीय नेते उपलब्ध नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. आता ५ किंवा ६ एप्रिलला हा कार्यक्रम अपेक्षित आहे.
3 वेळा तारीख पुढे ढकलली
मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर २०२५ ही उद्घाटनाची तारीख होती. त्यानंतर २६ जानेवारीला मेट्रो प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन होते. त्यानंतर ३ एप्रिल ही तारीख देण्यात आली. आता तीही रद्द करण्यात आली आहे. काम पूर्ण झाल्यानंतरही सर्वसामान्य प्रवाशांना वाहतूककोंडीतूनच प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.Mumbai Metro: दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रोचं श्रेय कुणाचं? उद्घाटनापूर्वीच नेत्यांची चढाओढ; ‘मेट्रोमन’, ‘शिल्पकारांची’ फलकबाजी
आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि केरळमधील प्रचारसभांमुळे वरिष्ठ राजकीय नेते मुंबईतील कार्यक्रमासाठी उपलब्ध नाहीत. त्यामुळे पूर्वनियोजित ३ एप्रिलचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. तत्पूर्वी एमएमआरडीएने ‘एक्स’वरून मेट्रो विस्ताराचे व्हिडीओ प्रसृत केले होते. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही ‘वचन दिया..पूरा किया’ अशा माहितीची पोस्ट ‘एक्स’वर शेअर करत कार्यक्रम ३ एप्रिलला असल्याचे जाहीर केले होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) कार्यक्रम पुढे ढकलल्याबाबत अधिकृत कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही.
दहिसर ते मिरा-भाईंदर या ४.५ किमीच्या मेट्रो नऊ मार्गाची सर्व तयारी पूर्ण झाली असून, चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. यात दहिसर (पूर्व), पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशिगाव स्थानकांचा समावेश आहे. ही मेट्रो सुरू झाल्यानंतर मिरा रोड–भाईंदर परिसरातील लाखो प्रवाशांना कोंडीमुक्त प्रवास करणे शक्य होणार आहे.
Mumbai Metro : मिरा-भाईंदर दहिसर मेट्रो 3 एप्रिल पासून सुरु होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
ठाणे-बोरिवली प्रवास होणार सुकर भारतातील सर्वांत मोठा शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगद्याचे खोदकाम सुरू होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर ठाण्यातील घोडबंदर ते बोरिवलीतील पश्चिम द्रुतगती मार्गादरम्यान एक ते दीड तासाचा प्रवास १५ मिनिटांत शक्य होणार आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा