• Mon. Sep 7th, 2026
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, पाहा लाइव्ह एका क्लिकवर


Marathi Live News: ऐन एप्रिल महिन्यात पुण्यासह नाशिक आणि विदर्भात कोसळलेल्या पावसाने दाणादाण उडवली. पुणे शहरात गुरुवारी दुपारी सुमारे दोन तास वादळीवारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने एप्रिल महिन्यातील पावसाचा १३० वर्षांचा विक्रम मोडला. दरम्यान, ‘मुख्य धोरणात्मक उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने अमेरिकेचे सैन्य इराणमधील आपले काम लवकरच पूर्ण करेल’, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी येथे केले. ‘पुढील दोन ते तीन आठवड्यांत आपण इराणवर अतिशय तीव्र हल्ले करणार असून त्यांना ते जेथून आले तेथे म्हणजे, पाषाणयुगात धाडणार आहोत’, अशी दर्पोक्तीही ट्रम्प यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed