Pune Rain Woman Death : पुण्यात दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याच वेळी मंदिराशेजारील वडाचे मोठे झाड हातगाडीवर कोसळल्याने फूल विक्रेतीचा मृत्यू झाला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरात झालेल्या मुसळधार पावसात सिंहगड रस्त्यावर हृदयद्रावक घटना घडली असून, मंदिराशेजारी फुल विक्री करीत बसलेल्या महिलेच्या अंगावर भलेमोठे झाड कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या १५ ते २० वर्षांपासून रंजना गिरी या मंदिराशेजारी फूल विक्री करीत होत्या. उन्हात-पावसात आसरा देणारे हेच वडाचे झाड आज त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दत्तवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.
नेमकं काय झालं?
पोलिस व अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, रंजना गिरी या गेली अनेक वर्षे सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुती मंदिराजवळ फुल विक्रीचा व्यवसाय करीत होत्या. गुरुवारी हनुमान जयंती असल्याने त्या सकाळपासूनच हातगाडीवर फुल विक्री करीत होत्या. दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्याच वेळी मंदिराशेजारील वडाचे मोठे झाड हातगाडीवर कोसळले. या घटनेत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. Crime News : 80 लाखाचं पॅकेज, AI मुळे नोकरी गेली; इंजिनिअर नवऱ्याने जीव दिला, शेवटची चिठ्ठी वाचून बायको 20 मिनिटं थांबली, स्वतःलाही संपवलं गेल्या १५ ते २० वर्षांपासून रंजना गिरी या उन्हात-पावसात याच वडाच्या झाडाखाली व्यवसाय करीत होत्या. हे झाड त्यांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनले होते; परंतु नियतीचा क्रूर खेळ असा, की अनेक वर्षे सावली देणारे तेच झाड अखेर त्यांच्या जीवावर बेतले. वादळी वाऱ्यात कोसळलेल्या त्या झाडाने होत्याचे नव्हते केले. ज्या झाडाखाली आयुष्य जगले, त्याच झाडाच्या रूपाने काळाने त्यांच्यावर घाला घातल्याची हळहळ परिसरात व्यक्त होत आहे, अशी माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पोटे यांनी दिली.
महागडे उपचार करण्यासाठी ३ सरकारी योजना; ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्यसेवा
Pune Crime : माझ्या सायलीची बॉडीही घरी आणता आली नाही, हातही लावू शकले नाही; बारामतीतील विवाहितेला पतीने संपवलं, आत्याचा टाहो
महिलांनी सांगितला थरार
“गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वारे आणि पावसाला सुरुवात झाली. आम्ही शेडमध्ये जाऊन उभे राहिलो, मात्र रंजना गिरी या झाडाच्याच आडोशाला बसल्या होत्या. जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि वारं सुटायला लागलं. अचानक झाड कोसळून रंजना ताई त्याखाली अडकल्या. दुर्दैवाने या धक्कादायक घटनेत त्यांचा मृत्यू झाला” अशी माहिती रंजना गिरी यांच्यासोबत रोज असलेल्या महिलांनी दिली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा