• Mon. Jun 15th, 2026
    Ashok Kharat Son : कंपाऊडवरुन उडी मारून बंगल्यात प्रवेश, अशोक खरातच्या मुलाला फिल्मी स्टाईल अटक; बायको फरार

    Ashok Kharat Son Arrested : संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे अशोक खरात प्रकरण, आता या प्रकरणात त्याच्या मुलाला देखील अटक करण्यात आली आहे.

    अशोक खरातच्या मुलाला अटक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : राज्यभर गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिकच्या खरात प्रकरणात आता SIT कडून खरात याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. अगदी फिल्मी स्टाईल पद्धतीने अशोक खरातच्या मुलाला तपास यंत्रांनी ताब्यात घेतलं आहे. कर्मयोगी नगर येथील खरातच्या तृप्तबाला या बंगल्याच्या ठिकाणी SIT पथकातील ३ महिला आणि १ पुरुष अधिकारी यांनी बंगल्याच्या गेट ठोठावला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तपास यंत्रणामधील अधिकारी यांनी शेजारी असलेल्या बंगल्याच्या कंपाऊडवरुन उडी मारून बंगल्यात प्रवेश केला आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

    मुलाला चौकशीसाठी आणलं

    खरातच्या मुलाला महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे अधिक चौकशीसाठी आणण्यात आलं आहे अशोक खरात याची गेल्या १३ दिवसापासून SIT कडून कसून चौकशी सुरू आहे. त्यातच आता त्याच्या मुलाला देखील SITच्या पथकानं ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे एसआयटीच्या चौकशीमध्ये आता काय समोर येतं? कोणत्या दिशेने SITचा तपास हा सुरू आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
    Maharashtra TimesAshok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात नवा पेच; SIT ला विशेष सरकारी वकील मिळेना, अजय मिसर यांनी दिला नकार

    अशोक खरातच्या बायकोची दुसरी बाजू

    भोंदू कॅप्टन अशोक खरात याच्या गुन्ह्यांची चौकशी सुरू असतानाच या प्रकरणाची एक वेगळी बाजू समोर आली आहे. ऐशोआरामी जीवन जगणारी त्याची पत्नी कल्पना (पूर्वाश्रमीची सुनीता) खरात हिचे माहेर मात्र सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात आजही हलाखीच्या परिस्थितीत आहे.

    कल्पना खरात फरार

    फसवणुकीच्या एका गुन्ह्यात कल्पना खरात हिचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे. तिच्या अटकेची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांचे पथक नाशिकमधील कर्मयोगीनगर परिसरातील ‘तृप्तबाला’ बंगल्यावरही पोहोचले होते. मात्र त्याआधीच ती फरार झाली, अशी माहिती मिळत आहे.
    Maharashtra TimesAshok Kharat Case : खरात कुटुंबावर SITचा फास; तृप्तबाला बंगल्यातून मुलगा ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार

    भाऊ आणि वडिलांचं निधन

    कल्पना खरात हिचे माहेर पाडळी आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबावर अलीकडच्या काळात दु:खांचे डोंगर कोसळले. कल्पनाच्या मोठ्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. पाठोपाठ वडिलांचेही आजारपणामुळे निधन झाले. त्यामुळे घरात वृद्ध आई, भाऊजयी आणि लहान भाचा असेच कुटुंब उरले आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा