• Tue. Sep 22nd, 2026

साहित्य अकादमीचा मराठीसाठीचा ‘युवा पुरस्कार’ प्रदीप कोकरे यांना प्रदान – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Apr 1, 2026
साहित्य अकादमीचा मराठीसाठीचा ‘युवा पुरस्कार’ प्रदीप कोकरे यांना प्रदान – महासंवाद

नवी दिल्ली,  दि. १ : साहित्य अकादमीतर्फे २०२५ या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या युवा साहित्य पुरस्कारांचे आज येथे वितरण  करण्यात आले. मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, शाल आणि पन्नास हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

नवी दिल्लीतील श्रीराम सेंटरमध्ये झालेल्या विशेष समारंभात  साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री. कोकरे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक सूर्यप्रसाद दीक्षित ,  अकादमीच्या उपाध्यक्षा श्रीमती कुमुद शर्मा,   सचिव श्रीमती पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील मान्यताप्राप्त २३ भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना यंदाचे साहित्य अकादमी युवा पुरस्कार जाहीर झाले.  त्यात मराठी भाषेसाठी प्रदीप कोकरे यांना  ‘खोल खोल दुष्काळ डोळे ‘ या रचनेसाठी हा सन्मान जाहीर झाला होता.

साहित्याला मिळणारा पुरस्कार हा लोकमान्यतेचे प्रतीक असतो असे सांगून श्री. सूर्यप्रसाद दीक्षित म्हणाले, की  युवा अवस्था ही केवळ विशिष्ट कालावधीदर्शक संकल्पना नाही, तर ती एक चेतनेची जाणीव आहे. जगाच्या इतिहासात अनेक महान व्यक्तिमत्त्वांनी तारुण्यावस्थेत लक्षणीय दिशादर्शक काम केले आहे. आज देशात युवकांची मोठी संख्या आहे. ही ऊर्जा प्रेरित करण्यासाठी युवा लेखकांनी सकारात्मक जाणिवचे लेखन करताना वाचकांना ज्ञानविज्ञानाशी जोडण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावेत.

अकादमीच्या सचिव श्रीमती होळकर यांनी प्रास्ताविक केले तर श्रीमती कुमुद शर्मा यांनी आभार मानले.

इतर भाषेतील साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते याप्रमाणे  – ( भाषा व लेखक)

* आसामी- सुप्रकाश भुयान

* बांगला – सुदेष्णा मोईत्रा

* बोडो – अमर खुंगुर बर

* इंग्रजी – अव्दैत कोट्टारी

* गुजराती  – मयुर खावडू

* हिंदी – पार्वती तिर्की

* कन्नड –  दिलीपकुमार आर

* कश्मीरी – साईका सहर

* कोकणी – ग्लिनिस डायस

* मैथिली – नेहा झा मणि

* मलयाळम् – अखिल धर्मजन

* मणिपुरी – अकोइजन जितेन सिंह

* नेपाली – सुवास ठकुरी

* ओडिया – सुब्रतकुमार  सेनापती

* पंजाबी  – मनदीप औलख

* राजस्थानी – पुनमचंद गोदारा

* संस्कृत – धीरजकुमार पाण्डेय

* संथाली  – फागू बास्के

* सिंधी –  मंथन बछाणी

* तमिळ  – लक्ष्मीहर टी

* तेलुगु – प्रसाद सुरी

* उर्दू –  नेहा रुबाब

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed